21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » वाचनाने सकारात्मक दृष्टिकोन मिळतो – स्वप्नील पाटील
महाराष्ट्र

वाचनाने सकारात्मक दृष्टिकोन मिळतो – स्वप्नील पाटील

अभिजात मराठी साहित्य सेवा संघाचा ‘चला वाचूया’ उपक्रम संपन्न

डाॅ. दिपेश पष्टे/महाराष्ट्र
ठाणे : अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वज्रेश्वरी(ठाणे) येथे ‘ चला वाचूया ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘वाचन मनाला विचारी बनवते. विचारांनी समृद्ध व्यक्ती ही समाज उन्नतीतील महत्वाचा घटक आहे. वाचनाने मानवी जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. बालवयातचं मुलांवर वाचन संस्कार व्हायला हवे’ असे प्रतिपादन अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा प्रसिद्ध वक्ते स्वप्नील पाटील यांनी केले. अंबिकाबाई धर्माजी जाधव कन्या विद्यालय वज्रेश्वरी येथे आयोजित ‘चला वाचूया ‘ उपक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती औचित्यावर वाचन प्रेरणा दिन निमीत्त संपूर्ण महाराष्ट्रभर चला वाचूया या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग वज्रेश्वरी येथे संपन्न झाला. यावेळी अभिजातचे कोषाध्यक्ष ऋषिकेश सावंत यांनी अब्दुल कलाम यांच्या चरित्राचा परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अभिजातचे उपाध्यक्ष तुषार ठाकरे, सहकार्याध्यक्ष विवेक शेळके, शाळेचे मुख्याध्यापक वसईकर सर यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिधा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पादीरे सर यांनी केले.

Related posts

संकट संपलेलं नाही

Bundeli Khabar

वृद्धाश्रमातल्या विधवांसाठी आरोग्य शिबीर

Bundeli Khabar

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!