21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » डॉ.अजय डोके यांचे डाकीवलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र

डॉ.अजय डोके यांचे डाकीवलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : डाकिवली गावात सालाबादप्रमाणे वीर हनुमान मित्र मंडळ यांच्याकडून आयोजित नवरात्र उत्सवात पालघर जिल्ह्यात पहिले UPSC परीक्षा उत्तीर्ण डॉ.अजय डोके यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
आपले करिअर घडवण्यासाठी कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे याबद्दल विशेष मार्गदर्शन करतांना डोके यांनी स्वतःला आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. नवरात्र उत्सव निमित्त मंडळाने विविध विषयांवर आधारित उपक्रम राबविले होते. त्यानिमित्ताने मंडपात क्रिश जगदीश चातुर्य व धनश्री जगदीश चातुर्य यांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्शित केली होती. डॉ अजय डोके यांनी ती चित्रे पाहिली त्यानंतर क्रिश व धनश्री यांना बोलावून घेतले व त्यांचे उत्कृष्ट चित्र रेखाटन केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील शालेय शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वीर हनुमान मित्र मंडळाचे सर्व सभासद, ग्रामस्थ व गावातील विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाड पूरग्रस्तांना मदत

Bundeli Khabar

चार इंजीनियरों को शहर में सड़कों की खराब स्थिति को लेकर निलंबित

Bundeli Khabar

गायों की हो रही मौत पर संग्राम सिंह ने 11 मोबाइल एम्बुलेंसस सुविधाओ को दी हरी झंडी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!