22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211012 WA00102
महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद ला वाड्यात चांगला प्रतिसाद,आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : उत्तरप्रदेशातील लखिमपुर खिरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडघटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वाडा शहरात व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आघाडी सरकार मधील मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काॅंग्रेसच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन लखिमपुर येथील शेतकरी हत्याकांड घटनेचा निषेध करुन हे कृत करणा-यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी करीत ् केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वाडा शहरात मोर्चा काढला.

आजच्या बंदमध्ये वाडा, कुडूस, खानिवली तसेच विक्रमगड येथील बाजारपेठ पुर्णता बंद होती. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस सुरु होत्या.


Bundelikhabar

Related posts

मानवाधिकार दिवस पर जीएसटी कमिश्नर सुवीर मिश्रा, उत्तर प्रदेश राज्यमंत्री तरुण राठी और अनूप जलोटा की उपस्थिति

Bundeli Khabar

सकल मराठा महासंघातर्फे अडीवळीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Bundeli Khabar

Salute to Nari Shakti – Dr. Sumaya Reshma

Bundeli Khabar
error: Content is protected !!