31.7 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » गरीब, गरजु, अनाथाना आपन स्वतः जेवन घालू शकतो हे आपले परम भाग्य – डॉ. मनिलाल शिंपी
महाराष्ट्र

गरीब, गरजु, अनाथाना आपन स्वतः जेवन घालू शकतो हे आपले परम भाग्य – डॉ. मनिलाल शिंपी

किशोर पाटील/महाराष्ट्र
अक्कलकोट : अक्कलकोट स्वामी समर्थ संस्थांनचे संस्थापक अध्यक्ष जन्नमेंजय राजे भोसले यांच्या संस्थेतर्फे मठाचे सचिव यांच्या शुभ हस्ते, डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी कमांडर तथा आर.एस.पी अधिकारी ठाणे कल्याण युनिट,यांचा सपत्नीक स्वामींची प्रतिमा व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वामीं समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आणि स्वामीनारायण ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री.दिनेश भाई ठक्कर यांच्या सहकार्याने अक्कल कोट येथील २०० गरजू आणि गरीब बालक व नगरिकाना अन्नदान करण्याचे कार्य माझ्या सारख्या पामरा कडून घडले.त्यामुले मी धन्य झालो असल्यांचा आनंद होत आहे. आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे, परंतु समाजातील गरीब, गरजु, अनाथाना आपन स्वतः जेवन घालू शकतो हे आपले परम भाग्य असल्याचे मत आर एस पी अधिकारी कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना व्यक्त केले. त्या नतर आई तुळजाभवानी मंदिर परिसराची कल्याण , ठाणे जिल्ह्यातील भाविकांकडून साफसफाई,करून घेऊन स्वच्छ्ता अभियानाचे महत्व पटवून संमस्त भाविकाना पट ऊन दिले. स्वच्छ्ता ,सफाई ,झाडू मारताना खऱ्या अर्थाने आई जगदंबेची कृपा लाभली, खूप अविस्मरणीय अनुभव आला
अक्कलकोट स्वामी समर्थ संस्थान यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या अंनक्षेत्राच्या माध्यमातून भोजन वाटप सेवा करण्याची संधी उपलबद्ध झाली. अन्नदान करून भोजन वाटप केले.त्यामुळे स्वामींनी, समर्थांनी , माझ्या सारख्या भक्ता कडून अन्नदान करण्याचे कार्य करून घेतले है माझे व माझ्या कुटुंबियांचे भाग्य संमजतो असेही शेवटी त्यानी दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगीतले.

Related posts

वाडा तालुक्यातील गाव-खेड्यापाड्यात माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत; गं पोरी गवरी आली

Bundeli Khabar

तेरा अनुकंपाधारकांचा जिल्हा परिषदेच्या सेवेत समावेश

Bundeli Khabar

अंबरनाथच्या मलंगगडापर्यंतची वाट होणार सुकर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!