22.4 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20210930 WA0020
महाराष्ट्र

मुली वाचवा मुली शिकवा हा दृष्टिकोन सर्वांनी समोर ठेवून स्रीभ्रूण हत्या टाळावी- प्रताप राव पाटील

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : घाटकोपर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प १ कार्यालयामार्फत “पोषण माह २०२१”निमित्त सही पोषण देश रोशन या संकल्पनेनुसार विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. लक्ष्मीबाग परिसर , ६ नंबर बिट च्या माध्यमातून मुख्य सेविका वैशाली खोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना शाखाप्रमुख अजय भोसले, महिला शाखा संघटक सौ. संगीता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नित्यानंद नगर लक्ष्मी बाग परिसर या ठिकाणी राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सांगितले की घाटकोपर एक प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये पोषण माह २०२१ ‘ या उपक्रमांतर्गत बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेला आत्मसात करून आपल्या देशातील मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे स्रीभ्रूण हत्या वाढतआहेत स्री संपूर्ण जगाची नव्हे तर विश्वात्माची आई आहे, संतानी सांगितले आहे की, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तर त्या आईची जगात येण्याची हत्या का केली जाते ते आपण सर्वांनी समजुन घेतले पाहिजे व आचारनात आणले पाहिजे, स्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे, मुलगा म्हनजे वंशाचा दिवा ही विचार सरणी बदललि पाहिजे, मुलगी ही वंशाचा दिवा आहे हे आपल्या मनामनात रुतले पाहिजे, तरच आपला नव्हे तर संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास होईल असे या प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. प्रतापराव पाटील यांनीआपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले. नित्यानंद विभाग शिवसेना शाखाप्रमुख अजय भोसले यांनी परिसरातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांमार्फत शक्य ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. सेविका व मदतनीस यांनी आपल्या परिसरातील किशोरी मुली गरोदर माता स्तनदा माता तसेच कुपोषित बालकांची वेळेवर माहिती घेऊन त्याबाबतचा अहवाल कार्यालयात दिला तर कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन सही पोषण देश रोशन ही योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी वेळेवर अहवाल सादर करावा असे आव्हान मुख्य सेविका वैशाली खोपाळे यांनी केले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण आहारावर आधारित मंगळागौर नृत्य गीत सादर केल व कुपोषित पणाचे परिणाम काय होतात यावर पथनाट्य सादर केले, तसेच कार्यक्रमाच्या विविध उपक्रमांबाबत आणि पोषण आहार माह यशस्वी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त जनजागृती घडवून आणण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून आम्ही विशेष मोहीम राबवणार असल्याचे मुख्य सेविका अरुना कालेकर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य सेविका सौ. संगीता मनीलाल शिंपी, वैभवी मयेकर आणि नित्यानंद नगर मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपशाखाप्रमुख प्रशांत जाधव अनिल फापाळे व इतर समाज सेवक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा शिंदे यांनी केले.कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे मुख्य सेविका वैशाली खोपाळे यांनी आभार मानले, सकस पोषक आहाराबाबतची पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Bundelikhabar

Related posts

ऑडी इंडियाने आकर्षक रूपातील ‘ऑडी क्यू५’ लॉन्च केली

Bundeli Khabar

एनएआर-इंडिया ओलिंपियाड 2022-23 का आयोजन

Bundeli Khabar

बाल कविता वाचन, कथा कथन, भाषिक खेळ आणि कोडी यांचे सादरीकरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!