22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » बूमिंग बुल्स अकॅडमीची पाच हायब्रिड सेंटर्स सुरू करण्याची योजना
महाराष्ट्र

बूमिंग बुल्स अकॅडमीची पाच हायब्रिड सेंटर्स सुरू करण्याची योजना

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : बूमिंग बुल्स अकॅडमी या शेअर बाजार प्रशिक्षण संस्थेने दिल्ली, नोएडा, मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद या पाच शहरांमध्ये हायब्रिड सेंटर सुरू करण्याची योजना आखली आहे. स्टॉक ट्रेडिंगमध्ये अभ्यासक्रम शोधणा-या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिकण्याचे अनुभव वाढविणे हे उद्दीष्ट आहे. याशिवाय व्यवसाय हाताळण्याचा मध्यम अनुभव असलेल्या आणि ५०-६० विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा असलेल्या किंवा एकामध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखणाऱ्या उद्योजकांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याची अकादमीची योजना आहे.
२०१९ मध्ये सुरू झालेली बूमिंग बुल्स अॅकॅडमी नवीन गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांसाठी एक सोपा ऑनलाइन ट्रेडिंग कोर्स प्रदान करते. ज्यात तरुण भारतीय पिढीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. परिस्थिती पूर्ववत होत असताना आता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक आणि व्यापार पद्धतींविषयी वैयक्तिक प्रशिक्षण देण्याची अकादमीची योजना आहे.
पाच प्रमुख शहरांमध्ये हायब्रिड सेंटर्स सुरू झाल्यामुळे, त्यांनी कौशल्य वाढवणा-या उपक्रमांसह विस्तृत शिक्षण घेण्याची योजना आखली आहे, ज्यात शंका निरसन सत्रे, परीक्षा/ नियमित चाचण्या, असाइनमेंट इत्यादींचा समावेश आहे. सध्या, अकादमी आपल्या अध्यापन विद्याशाखा विस्तार करीत आहे ज्यात शेअर बाजार आणि व्यापारात दीर्घकाळ कौशल्य असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे.
बूमिंग बुल्स अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश सिंग ठाकूर म्हणाले, “भारतीय तरुणांमध्ये स्टॉक ट्रेडिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही ऑनलाइन उपक्रम म्हणून बूमिंग बुल्स अकॅडमी सुरू केली जेणेकरून ते अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील. गेल्या दोन वर्षांत आम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवर विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद पाहिला आहे. सुरुवातीला आम्ही पाच शहरांमध्ये हायब्रिड सेंटर्स सुरू करण्याचा विचार करीत आहोत आणि ऑफलाइन तसेच ऑनलाइन शिकण्याचा अनुभव देण्याच्या उद्देशाने भारतभरातील २५+ शहरांमध्ये विस्तार करणार आहोत. पुढे जाऊन, २०२२ पर्यंत १०० दशलक्ष इतक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. अकादमी नवशिक्या व्यापाऱ्यांसाठी एक सोपा शेअर बाजार ट्रेडिंग कोर्स प्रदान करते आणि भारतीय तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यावर लक्ष केंद्रित करते.”

Related posts

अटाळी आंबिवली व्यापारी संघटनेतर्फे कोकण पूरग्रस्तांना मदत

Bundeli Khabar

फ़र्ज़ी बिल निकालने के मामले में PMC के डिप्टी इंजीनियर टूले निलंबित

Bundeli Khabar

जिल्हा अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात अलिबाग मध्ये महा कर्ज मेळावा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!