31 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » विनामूल्य शिवणकाम वर्ग सुरू
महाराष्ट्र

विनामूल्य शिवणकाम वर्ग सुरू

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : कोकण कला शिक्षण विकास संस्था व वासिंद ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 महिलांसाठी विनामूल्य शिवणकाम वर्ग योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे।

या शिवणकाम वर्ग योजनेचे उद्घाटन मंगळवारी (ता.28) सम्राट अशोक नगर (बौध्दवाडा) समाजहाॅल येथे रिपाईच्या नगरसेविका प्रेरणा गायकवाड, महीला तालुका प्रमुख अँड. प्रतिभा कांबळे, पंचायत समिती सदस्य संजीवनी कोचुरे, अर्चना शिंदे यांनी केले।

यावेळी टेलरिंग शिक्षिका रजनी निकम आणि सरिता जाधव उपस्थित होत्या. यावेळी ॲड. प्रतिभा कांबळे यांनी महिलांना महिला सक्षमीकरणाचे मोलाचे मार्गदर्शन करताना  21 व्या शतकातील आपण महीला माता सावित्री, माता रमाई, माता जिजाऊ यांच्या विचारांवर चालणा-या महिला आहोत याची आठवण करून दिली. या उपक्रमासाठी नगरसेविका प्रेरणा गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे आयोजक तारा सांगळे यांनी केले.।

Related posts

प्रियदर्शिनी फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण

Bundeli Khabar

गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी

Bundeli Khabar

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘ मुंबई शहर ग्रंथोत्सव”

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!