31 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी
महाराष्ट्र

गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक सण व उत्सव इत्यादींच्या कालावधीमध्ये परीक्षा न घेणे व शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी स्थानिक ठिकाणांच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ यांच्या सहमती अनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सव, दिवाळी व अन्य सण / उत्सव कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करु नयेत अशा सूचना दिल्या आहेत. तथापि राज्य मंडळांच्या शाळां व्यतिरिक्त इतर खाजगी शाळांमध्ये सदर सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच पालघर परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात आपल्या मूळगावी जात असतात. त्यामुळे गणेशोत्सवात ५ दिवस सुट्टी जाहीर करावी. तसेच या काळात कोणत्याही परीक्षा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना आपण सर्व शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांना कराव्यात. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना दिले.

गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात असल्यामुळे गावी जात असतात. शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ सर्व शाळांना उत्सव काळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शाळांना निर्देश देण्यात येतील असे सांगितले आणि आज तातडीने सदर आदेश संबंधित विभागांकडे रवाना केला.

Related posts

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी नियम पाळावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Bundeli Khabar

ठाणे महापालिका आयुक्तांनी केली रेल्वे पास मदत कक्षाची पाहणी : मनुष्यबळ वाढविण्याचे दिले निर्देश

Bundeli Khabar

रक्षाबंधनानिमित्त ट्रेलचा ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ उपक्रम,भावा-बहिणीमधील प्रेमाचे नाते करणार साजरे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!