किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या विद्यमाने फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यानी गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपरयात आरोग्य शिबीराचे मोफत आयोजन करुन गरीब गरजु सह सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात पुढेे करून आपन सामाज्याचे काही तरी देने लागतो हा विचार मनी धरून सामाज्या प्रति आपली भावना सामाजिक बाधिलकी च्या रुपाने करत आहेत,सदर शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व ) येथून केले जाते. त्यामुले प्रत्येक शिबिरातून २०/२५ नागरिकांना (रुग्णांना) मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तेरणा हॉस्पिटल याठिकाणी पाठवण्यात येते. आजही झालेल्या शिबिरात २५ रुग्णांना तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. त्यामधे खलील आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया 5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया 6) हर्निया 7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया 8) पुरुष ग्रंथी वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया 10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया 12) अपेन्डिस 13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया 14) मुतखडा शस्त्रक्रिया 15) जीभेच्या शस्त्रक्रिया 16) किडनीचे आजार 17) गर्भपिशवी दुरुस्ती 18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याच कडून मोफत केली जाते.
Home » आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी
Related posts
- Comments
- Facebook comments