31.7 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » २७ सप्टेंबर च्या भारत बंद आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस सक्रिय सहभाग नोंदवणार – दयानंद चोरघे
महाराष्ट्र

२७ सप्टेंबर च्या भारत बंद आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस सक्रिय सहभाग नोंदवणार – दयानंद चोरघे

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
ठाणे : केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्रात आणलेले तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी संघर्ष करीत आहेत.शेतकरी वर्गाचा सध्याचा संघटित संघर्ष ऐतिहासिक आहे आणि लढ्याची तीव्रता उल्लेखनीय आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वतंत्रपणे पक्षीय आंदोलने, उपोषण केले असून या आंदोलनात दहा महिने होत असल्याबद्दल संयुक्त किसान मोर्चाने भारत बंद ची हाक दिली असून ठाणे ग्रामीण जिल्ह्यात होत असलेल्या या आंदोलनात काँग्रेस पक्ष सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे।

ठाणे जिल्ह्यात भारत बंद यशस्वी करण्यासाठी भाजप सोडून सर्वच राजकीय पक्ष संघटित झाले असून शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठका घेतल्या आहेत, काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून भाजपने शेती व शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना उद्धस्त करण्याचा पद्धतशीरपणे डाव आखला असून या विरोधात दहा महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शूर व लढाऊ शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून कॉंग्रेस पक्ष सक्रिय पणे आंदोलनात सहभागी होत असल्याचे काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कळविले असून सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही दयानंद चोरघे यांनी केले आहे।

Related posts

कैबिनेट ज्वाइंट सेक्रेट्री सौरभ तिवारी के लिखे गाने ‘अपनी मोहब्बत’ की शूटिंग कंप्लीट

Bundeli Khabar

शादी के खर्चे में कटौती कर बचे पैसो से गरीबो के लिए तीन दिवसीय नि:शुल्क टीकाकरण शिविर का आयोजन

Bundeli Khabar

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मंगळवारी घेणार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!