21.4 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210925 WA0009
महाराष्ट्र

शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम

Bundelikhabar

शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम,
मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ तालुक्यात लसीकरण.

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहापूर वगळता इतर चार तालुके म्हणजे मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ येथे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे.
चार तालुका अंतर्गत ग्रामीण भागात एकूण 105840 लाभार्थी 0 ते 5 वयोगटातील अपेक्षित असून एकूण 1101 बुथ व 121 मोबाईल बुथवर 2553 कर्मचारी व 232 जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनिष रेंघे यांनी दिली. कोविड -19 साथ कालावधीत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा वापर करून ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आल्याचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी यांनी सागितले.


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक,
या मोहिमेची अंमलबजावणी यशस्वी होण्याकरिता गुरुवार दिनांक 23.09.2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण जिल्हा कार्यबल समिती सभा अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे डॉ. भाऊसाहेब दांगडे व अति. जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे, महानगरपालिका मा.बा.सं.अधिकारी, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला-बाल विकास, तालुका आरोग्य अधिकारी, WHO सर्वेलन्स अधिकारी डॉ. विनायक जळगावकर इ. उपस्थित होते.


जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आवाहन,
पोलिओच्या समुळ उच्चाटना करिता सर्व नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई पाटील , जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सुभाष पवार व आरोग्य सभापती श्रीम. वंदना भांडे यांनी केले आहे.


Bundelikhabar

Related posts

भाजपातर्फे श्रमिकांना ई-श्रम कार्ड

Bundeli Khabar

भिवंडी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी दहा कोटींची मदत जमा

Bundeli Khabar

‘जनहित में जारी’ के लिए विनोद भानुशाली, राज शांडिल्य और जय बसंतू सिंह को मिली सरहाना

Bundeli Khabar
error: Content is protected !!