29.8 C
Madhya Pradesh
May 16, 2024
Bundeli Khabar
Home » साईधाम फिल्पकार्ड लॉजिकस्टीक मध्ये स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मज्जाव :शिवसेनेचा जाब विचारण्यासाठी पुढाकार
महाराष्ट्र

साईधाम फिल्पकार्ड लॉजिकस्टीक मध्ये स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मज्जाव :शिवसेनेचा जाब विचारण्यासाठी पुढाकार

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : वासिंद-कांदळी जवळील कोशिंबी गाव हद्दीत असलेल्या कॅम्पस साई धाम अंतर्गत असलेल्या फिल्पकार्ड या नामांकित लॉजिकस्टीक (गोडाऊन) मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु यामध्ये शहापूर तालुक्यासह अंबाडी, वाडा परिसरातील तरुणांना सध्या रोजगार देण्यात टाळाटाळ केली जात असल्यामुळे याबाबत जाब विचारणा करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.


या ठिकाणी परिसरातील तरुणांना कामावर घेण्यासाठी लॉजिकस्टीक व्यवस्थापनाकडून नकार दर्शविला जात असल्याने सदरची बाब प्रस्तुत प्रतिनिधी यांनी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील यांची काही इच्छुक तरुणांसोबत भेट घेऊन हि समस्या मांडली. तर तत्पूर्वी भिंवडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे तसेच शिवसेना भिंवडी संपर्क प्रमुख तथा मिनाक्षी फाऊंडेशन अध्यक्ष विष्णूजी चंदे यांच्याशी भ्रमणद्वारे संपर्क साधून वासिंद परिसर व शहापूर तालुक्यातील तरुणांना कामासाठी संधी दिली जात नसल्याची खंत व्यक्त करुन यासाठी प्रयत्नशील रहावे अशी मागणी केली.

दरम्यान, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील यांच्या नेतृत्व माध्यमातून तर आमदार शांतारामजी मोरे, तालुका प्रमुख विश्वासजी थले, उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या पुढाकाराने या प्रश्नाबाबत लवकरच व्यवस्थापन यांच्याशी चर्चा व जाब विचारून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संपर्क प्रमुख विष्णूजी चंदे यांनी म्हटले आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी लॉजिकस्टीक व्यवस्थापनचे अधिकारी ओमकार कर्णिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.

Related posts

दैनिक यशोभूमि के उपसंपादक बी एन गिरि लिखित टीएमसी नेता की जीवनी ‘सबके चहेते भूषण दा’ का विमोचन संपन्न

Bundeli Khabar

स्वर’लते’ची भैरवी

Bundeli Khabar

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!