30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210920 WA0010
महाराष्ट्र

कलाकार फाऊंडेशनकडून विविध राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धांचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Bundelikhabar

पालघर/डॉ.दिपेश पष्टे
पालघर : औरंगाबाद येथील निमाई हॉस्पीटल चित्रकला स्पर्धेत अनेक मुलांनी सहभाग घेतला व या स्पर्धेचे प्रमाण पत्र सुध्दा मिळाली. तसेच युनेस्को क्लब कुकाई, नवी दिल्ली यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय चित्रकला परीक्षेमध्ये २५००० विद्यार्थ्यांमधून कलाकार फाऊंडेशन चे दोन विद्यार्थी समीक्षा मोकाशी व हर्षदिप जाधव हे चौथ्या क्रमांकाचे कॉन्स्युलेशन बक्षीस प्राप्त झाले. तसेच अन्य ऑनलाईन झालेल्या स्पर्धांचे ही प्रमाणपत्रे प्राप्त झाले होती. खुप मुलांनी छान प्राविण्य प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कलाकार फाऊंडेशन, गोराड येथे हॉल मध्ये देण्यात आले.

परिक्षा स्पर्धेत फक्त नंबर यावा यासाठी नाही तर कुठेतरी या दुर्लक्षित मुलांना वाव सन्मान मिळावा यासाठी सहभागी करणे महत्त्वाचे म्हणून परिसरातील खुप सारी मुले कलाकार फाऊंडेशन अध्यक्ष महेश काचरे व सर्व टिम स्वखर्चाने बसवत आहेत. त्यात बहुतेक मुले हि गरीब हतबल असल्याने स्पर्धा परिक्षेला बसुच शकणार नाहीत त्यामुळे लागणारी फी, मोफत शिकवणी खर्च, सर्व साहित्य पेंसिल वह्या रंग इ.मोफत पुरवून सात्तत्याने सर्वोत्परीने कलाकार फाऊंडेशन टिम स्वखर्चाने देत आहे त्यामुळे कोणत्याही अडचनीशिवाय आनंदाने मुले कोणत्याही स्पर्धेसाठी परिक्षेत सहभागी होत आहेत. दानशुर होतकरु व्यक्ती संस्थानी या उपक्रमास पाठबळ सहकार्य केल्यास जास्तीत जास्त गरीब गरजू मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव नक्कीच देण्याचा प्रयत्न राहील असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोरोना काळामुळे कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. या प्रमाणापत्र व बक्षीस वितरण उपक्रमास कलाकार फाऊंडेशन अध्यक्ष महेश काचरे, भावेश काचरे, राजश्री काचरे सर्व फाऊंडेशन कमीटी ,गोराड पालकवर्ग, व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. सुदाम काचरे, मनोज बुंधे, सचिव रामु बेंदर, जयेश कदम, शनी सोनावणे, खजिनदार पुंडलिक सातवी, प्रथमेश कदम, दिनेश भोईर, यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.


Bundelikhabar

Related posts

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून समित्यांची नियुक्ती

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार कमांडर मनीलाल शिंपी यांना प्रदान

Bundeli Khabar

एमजी मोटर इंडिया ने छुआ 100,000 का आँकड़ा

Bundeli Khabar
error: Content is protected !!