19.8 C
Madhya Pradesh
September 19, 2024
Bundeli Khabar
Home » वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मिथुन पाटील यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मिथुन पाटील यांची बिनविरोध निवड

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी दि.१३ (किशोर पाटील)
भिवंडी तालुक्यात सदन शिल ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी वळ ग्रामपंचायत होय.या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ . दीपिका राजेश भोईर यांनी आपल्या पदाचा स्वखुषीने राजीनामा दिल्यामुळे सदर रिक्त झालेल्या पदासाठी अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्री राम एकनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री.अमोल कदम यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय वळ येथे नुकताच पार पडली. या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी श्री. मिथुन प्रभाकर पाटील यांचा एकच नामनिर्देशन पत्र आल्याने अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्री. राम एकनाथ भोईर यांनी मिथुन पाटील यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले.मिथुन प्रभाकर पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड होताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.तर सदर निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मावलत्या उपसरपंच सौ. दीपिका राजेश भोईर, सन्माननीय सदस्य श्री. अमित रामदास भोईर श्री .रामनाथ रामचंद्र पाटील सौ .राजूबाई बाळकृष्ण नाईक सौ. वनिता अनिल पाटील सौ. प्रेषिता भागीरथ पाटील सौ.योगिता नरेंद्र पाटील,त्यासोबतच गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांची देखील विशेष उपस्थिती होती।

नवनिर्वाचित उपसरपंच मिथुन प्रभाकर पाटील यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी उपस्थित सर्वांना दिले. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे, मा.सभापती सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे,मा.सभापती जि.प.सदस्य कुंदन पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक,शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील, दिलीप भोईर ,भाजपचे नेते हरिश्चंद्र भोईर,रामदास भोईर,वसंत भोईर,चंद्रकांत भोईर, पंचायत समितीचे माजी.सभापती श्री. विकास अनंत भोईर,युवा नेते व गुंदवली गावचे उपसरपंच सुमित सुरेश म्हात्रे, पिसे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रिंकल विजय पाटील,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री.चक्रधरी पाटील,वळ शाखा प्रमुख श्री.अनंता भामरे,सचिन पाटील , संपर्क सचिव संदीप पाटील, उप शाखा प्रमुख दयाराम पाटील,तालुका सचिव दीपक पाटील,तालुका सचिव राजेंद्र काबाडी,जय भगत, विजय पाटील, हेमंत (मुस्सा भाई ) गुळवी ,जांभुलपाडा माजी सरपंच श्याम पारधी, संपर्क सचिव राजेंद्र पाटील ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते।

Related posts

नवी मुंबई प्रभाग क्रमांक 97 विकासकामांना गती

Bundeli Khabar

मानसिक रूप से कमजोर लडके को उसके पिता को सुपुर्द किया

Bundeli Khabar

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!