19.8 C
Madhya Pradesh
September 19, 2024
Bundeli Khabar
Home » १५ अगस्त स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला ७५ फळ झाडांची लागवड
महाराष्ट्र

१५ अगस्त स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला ७५ फळ झाडांची लागवड

किशोर पाटील/महाराष्ट्र

पालघर : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण झाली. या अमृत महोत्सवा निमित्ताने पालघर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय यांच्या प्रांगणात ७५(अक्षरी पंचाहत्तर) फळ झाडांची लागवड करण्यात आली. तसेच फिक्कट प्लो मुंबई ( F I C C I Flo Mumbai ) या संस्थेच्या वतीने पर्यावरण जोपासण्यासाठी व भविष्यात या प्रांगणात लावलेल्या या झाडांची फळे यांचा शाळेत शिकणार्‍या विद्यार्थीना आस्वाद मिळावा. झाडा पासून मिळणारी सावलीही सुखदायक असणार. अश्या बहुपयोगी झाडाचे संवर्धन करणे महत्वाचे असल्या कारणांमुळे श्रीमती रुबिना शहापूरवाला , फिक्की प्लो मुंबई एन जी ओ चे चेअरमन, सौ उज्ज्वला काळे ,पालघर नगराध्यक्षा, श्री केदार काळे , पालघर संस्कृतीक मित्र मंडळ अध्यक्ष, श्रीमती हेमलता मॅडम मुख्याध्यापिका नवोदित विद्यालय पालघर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले।

तसेच फिक्की प्लो मुंबई या एन जी ओ मार्फत ग्रामीण भागातील जनतेसाठी, व विषेशतः लहान मुलांसाठी डॉक्टर उज्ज्वला काळे, श्री केदार काळे यांच्या मार्फत अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमाला श्रीमती नाजनीज कात्रक मॅडम मुश्तांग कंपनी, श्री एस एन सानप , व्हॉईस प्रिन्सिपल नवोदित विद्यालय, श्री बी एम चौधरी , बी एम देवरे , शिक्षक गण, श्री शैलेश ठाकुर आदि मान्यवर उपस्थित होते।

Related posts

ट्रेलद्वारे ‘बिग बॅश’ सेलची घोषणा

Bundeli Khabar

साहित्य शारदेनेच लावून घेतले माझ्याकडून रोपटे : मधु मंगेश कर्णिक

Bundeli Khabar

नाना पटोले यांच्या अटकेची मागणी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!