22.8 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210909 WA0032
महाराष्ट्र

बोडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : वासिंद पासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या वांद्रे गावाजवळील घाटाळ पाडा येथील एका बोटक्या विहिरीत बिबट्याचा पडून मृत्यू झाला आहे. अशी माहिती रात्री उशिरा हाती आली.


याबाबत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढले आहे. पिवळी जवळील वांद्रे येथील घाटाळपाडा या आदिवासी पाड्यावर असलेल्या एका जुन्या बोटक्या विहीरीत बिबट्या पडला असून त्या ठिकाणी दुर्गंधी वास येत असल्याचे येथील शिवसेना शाखा प्रमुख विजय रेरा यांनी सांगितले.


तर यासंदर्भात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी हे दाखल होऊन या बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे. तर रात्री शासकीय जागेत ठेवून त्यानंतर आज शवविच्छेदन करण्यात आले असून यामध्ये सदर बिबट्याचा पाण्यात बूडून मरण पावल्याचा प्राथमिक अहवालात नमूद झाले असल्याचे शहापूर वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी यांनी म्हटले.


सदर बिबट्या हा अंदाजे साडेतीन वर्षापुढील असून याबाबत पुढील योग्य ती पहाणी व तपासणी केली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.


Bundelikhabar

Related posts

१५ अगस्त स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला ७५ फळ झाडांची लागवड

Bundeli Khabar

सैनी इंडिया का रिकॉर्ड प्रदर्शन

Bundeli Khabar

ठाण्याचे जेष्ट रंगवलीकार आणि आर्टिस्ट श्री. सुनील मोरे यांना ‘ कला सन्मान पुरस्कार ‘ जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!