23.1 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210907 WA0040
महाराष्ट्र

दयानंद चोरघे यांच्या कार्यकर्ता संपर्क अभियानाला शहापूर मध्ये उस्फुर्त प्रतिसाद

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
शहापूर : ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यानंतर युवा नेते दयानंद चोरघे यांनी काँग्रेसमधील मरगळ झटकून टाकण्यासाठी कंबर कसली असून कार्यकर्ता संपर्क अभियान सुरू करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरायला सुरुवात केली आहे,शहापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी दोन दिवस शहापूर तालुक्याचा दौरा केला असून या अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे अभियानाचे प्रमुख व शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश धानके यांनी सांगितले,
दयानंद चोरघे यांनी अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकर्ता संपर्क अभियानाला सुरुवात केली असून या अंतर्गत त्यांनी शहापूर तालुक्याचा दोन दिवसांचा दौरा केला,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्यांनी कसारा, कलमगाव,गोलभन,किन्हवली,धसई,सापगाव, खातीवली, वासींद सारमाळ, डोळखांब,निभाळपाडा,बेलवली,शेनवा, शिडपाडा,चांग्याचापाडा,पांढरीचा पाडा,चरिव आदी गावाना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या,जनसम्पर्क कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधला तर कसारा व पांढरीचा पाढा येथे आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.दयानंद चोरघे हे जिल्हा अध्यक्ष झाल्यामुळे कार्यकर्त्यांमद्ये उत्साह निर्माण झाला असून चांगले नेतृत्व मिळाल्याने कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताकदीने लढविण्याचे दयानंद चोरघे यांनी संकेत दिले असून लवकरच शहापूर मध्ये प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी पद वाटप सोहळा होणार असल्याचे महेश धानके यांनी सांगितले।


Bundelikhabar

Related posts

छठपूजा के बाद उपवन तलाव व घाट पर शिवशांति प्रतिष्ठान ने किया स्वच्छता अभियान

Bundeli Khabar

घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना

Bundeli Khabar

नकळत रंगली स्पर्धा-समीर मार्कंडे, स्वप्नील शेजवळ,पुनम शिंदे छायाचित्र स्पर्धेतील विजेते

Bundeli Khabar
error: Content is protected !!