23.9 C
Madhya Pradesh
September 9, 2026
Bundeli Khabar
IMG 20210906 WA0067
महाराष्ट्र

अष्टपैलू व्यक्तीमत्व स्वप्नील पाटील नेशन बिल्डर अवाॅर्डने सन्मानि

Bundelikhabar

नशन बिल्डर अवॉर्ड देऊन स्वप्नील पाटील यांचा केला सत्कार

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
ठाणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ मेट्रो ठाणे यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात स्वप्नील पाटील यांना नेशन बिल्डर अवाॅर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले।


स्वप्नील पाटील हे शारदा विद्यामंदिर अनगांव येथे शिक्षक म्हणून मागील बारा वर्षापासून कार्यरत आहेत. विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परीचित आहेत. उत्तम लेखक, संवेदनशील कवी, प्रबोधनकारी व्याख्याते, नाट्य कलाकार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय संत तुकडोजी महाराज प्रबोधनकारी व्याख्याते लोकहिंद गौरव पुरस्कार, युवारत्न पुरस्कार, मराठी साहित्य संमेलनातून कवी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी वक्तृत्व, नाट्य, लेखन आदि क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. एका अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा सन्मान झाल्याने शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे।


पुरस्कार प्रसंगी त्यांनी रोटरी क्लब, विद्या प्रसारक मंडळ अनगांवचे अध्यक्ष विनित लेले, सचिव दिलीप पालये, प्रशासकीय अधिकारी गणेश लेले, खजिनदार श्रीनिवास देव यांचे विशेष आभार मानले।


Bundelikhabar

Related posts

शेमारू हिंदू भजन स्पीकर’ से त्यौहारों के उल्लास को बनाएं विशेष

Bundeli Khabar

फिल्म ‘काली’ के पोस्टर के खिलाफ द्वारिकामाई चैरिटी मैदान में

Bundeli Khabar

मुम्बई में शशिकला महेंद्र पाल के ‘पाल इन्शुरन्स सर्विसेस’ कार्यालय का उद्घाटन

Bundeli Khabar
error: Content is protected !!