22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » कुर्ला रेल्वे पोलीसची मोठी कामगिरी,७२ तासात आरोपी जेरबंद
महाराष्ट्र

कुर्ला रेल्वे पोलीसची मोठी कामगिरी,७२ तासात आरोपी जेरबंद

ब्युरो/महाराष्ट्र
कुर्ला : कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे, हद्दीत रात्रीच्या वेळेत वारंवार लोकलचे रॅकवर प्रवाशांनी ठेवलेल्या बॅगा उचलून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून आल्याने सदर गुन्ह्यांस प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्मीता ढाकणे, यांचे मागर्दर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बगाडे, व स्टाफ यांना विशेष सूचना देण्यात येवून सीएसएमटी ते मुलुंड रेल्वे दरम्यानचे सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यात येवून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले।

दरम्यान कुर्ला रे.पो. ठाणे, गु.र.नं. ३२२/२०२१, कलम ३७९ भा.दं.वि. चा तपास करीत असतांना, वाशी रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं. १३४/२०२१, कलम ३९२ भा.दं.वि. या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी नामे जमिरुल्ला अब्दुल रज्जाक अन्सारी, वय ३८ वर्षे, राह. आझाद नगर घाटकोपर पूर्व, मुंबई यांचा मा. न्यायालयाचे परवानगीने दि. ०१.०८.२०२१ रोजी रीतसर ताबा घेण्यात येवून सदर गुन्ह्यातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत असतांना, नमूद आरोपीनेच सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तसेच कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत बॅग उचलून चोरी या सदराखाली दाखल परंतु उघडकिस न आलेल्या इतर गुन्ह्यांची माहिती घेवून सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करीत असतांना, गु.र.नं. ३३९/२१ या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नमूद आरोपी दिसून आल्याने तपास सुरु करण्यात येवून आरोपीकडे कसून तपास करण्यात येवून त्याने केलेल्या निवेदनाप्रमाणे वरील नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेली सॅकबॅग, तसेच दुस-या गुन्ह्यातील एक मंगळसूत्र, एक साई हार, ५ आंगठ्या, ३ जोड कानातील रिंगा, व २ जोड कानातील झुमके, एक नथ, एक गणपती बाळी, असे एकूण ३,९६,३००/- किंमतीचे १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (१४ नग) हस्तगत करण्यात आले आहेत।

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त एम.एम. मकानदार सो, यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मीता ढाकणे, यांचे सूचनांप्रमाणे, पोउनि समीर बगाडे, पोहवा २५०३ प्रदिप शिंदे, पोहवा ३१३५ सचिन नागावकर, पोहवा १४०७ लिंगाळे, पोना २२०६ पाटील, पोना १७४९ पाटील, पोना १३१७ राठोड, पोशि राजपूत, खेताडे यांनी ७२ तास सतत तपास व पाठपुरावा करण्यात येवून पूर्ण केली आहे।

Related posts

अश्लीलता फैलाने वाले को घर में घुसकर मारेंगे: अध्यक्ष करणी सेना

Bundeli Khabar

भारताचा एक डाव आणि १३२ धावांनी दिमाखदार विजय

Bundeli Khabar

राज्यपाल सन्मानीत श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांच्या वतीने २०० दिव्यागाना मोफत धान्य वाटप

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!