39.2 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाकडे प्राधान्याने लक्ष देणार: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र

भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाकडे प्राधान्याने लक्ष देणार: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
भिवंडी : मुंबई , ठाणे, कल्याण या मोठ्या शहराजवळ असून देखील भिवंडी शहर हे अजूनही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे. भिवंडी शहर हे प्रामुख्याने कामगारांचे , अल्पसंख्याक भाषिक शहर आहे. त्यामुळे कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागात झोपडपट्टी देखील मोठ्या प्रमाणात आहे. तशाच अनेक समस्या देखील आहेत. शहरातील नागरिकांना अजूनही चांगल्याप्रकारे मूलभूत सोयी सुविधा मिळत नाही, या सर्व समस्या सोडवण्याकरता मी, मंत्री म्हणून मंत्रालय स्तरावरून सर्व प्रयत्न करीन. शहराच्या विकासाकरता जे जे करता येईल ते सर्व करीन, शहराच्या सर्वांगीण विकासाकरता सातत्याने प्रयत्न करीन असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी वासिययांना दिले।

भिवंडी शहराच्या विविध नागरी समस्या याविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेत आज समक्ष येऊन सर्व नगरसेवक व पालिका अधिकारी यांची एक संयुक्त बैठक स्व.यशवंत चौधरी सभागृहात घेण्यात आल , त्यावेळेला मंत्री जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळेला महापौर प्रतिभा विलास पाटील,पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर इमरान वली मोहम्मद खान, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, सभागृह नेते विकास निकम, सर्व पक्षीय गटनेते, अन्य सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते।


माननीय मंत्री महोदय पुढे म्हणाले की, शहराच्या प्रामुख्याने बऱ्याच समस्या आहेत यांमध्ये घरकुल योजना जर आपण म्हाडा मार्फत ही योजना राबविली तर वीस हजार घरे ही माडाच्या मार्फत शहरातील नागरिकांकरिता उपलब्ध होतील. शहराकरता 20 हजार घरांची भेट देत आहे. तसेच हे शहर अल्पसंख्यांक बहूल भाषिक आहे त्यांच्या करता असलेल्या सर्व योजना या शहरात राबविणार, शहराच्या विकासाकामाकरता मा.अर्थमंत्री महोदय यांच्याकडे विकास निधीची मागणी करावी, शहरा करता विशेष पाणीपुरवठा योजना मुंबई महानगरपालिकेकडून मंजूर करून घेणे, चांगले रस्ते याबरोबरच पायाभूत सोयी सुविधा याकडे लक्ष देणे यामध्ये नवीन रस्ते बांधणे , पाणी पुरवठा, वैद्यकीय , भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंगकरता जागा उपलब्ध करून देणे, वराळा तलाव सुशोभीकरण, शहरात क्लस्टर योजना योजना राबविणे, जी काही विकास कामे आहेत ज्या मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे आवश्यक आहे त्याकडे लक्ष देण्यात येईल. यातील विविध योजना ज्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत, त्या देखील मार्गी लावणेकामी मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाकडे प्राधान्याने लक्ष देणे हेच मुख्य लक्ष आहे त्याकरता महापौर, सर्व पदाधिकारी , पालिका आयुक्त यांनी मागण्यांचा पाठ पुरावा करावा असे देखील मंत्री महोदय म्हणाले. शहरात आझमी नगर परिसरात घर पडून झालेल्या दुर्घटनेत मृत पडलेल्या इसमाच्या नातेवाइकांना शासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत,तर जे जखमी आहेत त्यांचा औषधोपचाराचा खर्च शासन करेल तसेच जखमींना तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा देखील मंत्री महोदयांनी केली।

Related posts

चार इंजीनियरों को शहर में सड़कों की खराब स्थिति को लेकर निलंबित

Bundeli Khabar

महाराष्ट्र शासन महारेरा के ब्लैक लिस्ट में महाराष्ट्र के 1824 बिल्डर के प्रोजेक्ट शामिल

Bundeli Khabar

मानवी तस्करी कार्यशाळेचा समारोप

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!