19.8 C
Madhya Pradesh
September 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20210901 WA0055
महाराष्ट्र

कोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी, राजेश मुकादम यांची बिनविरोध निवड

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सदनशिल ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कोन ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.दर्शन रमाकांत म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सहखुशिने दिल्या मुळे रिक्त झालेल्या पदासाठी अध्यासी अधिकारी तथा सरपंच डॉ.सौ.रुपाली अमोल कराळे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राम विकास अधिकारी श्री जीवन कृष्णा ठाकरे यांच्या खास उपस्थितीत बुधवार दि.१/९/२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोनगाव येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी श्री राजेश तुकाराम मुकादम यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र आल्यामुळे त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून आद्यासीअधिकारी डॉक्टर रूपाली कराळे यांनी जाहीर केले.त्यांची निवड जाहीर होताच उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री.राजेश मुकादम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.जयंत टावरे,सौ. तजिन करेल,सौ.रेखा म्हात्रे,श्री. भरत जाधव,सौ.उज्वला कराळे,सौ.कविता भगत,श्री.अशोक म्हात्रे,सौ.कृतिका पाटील,सौ. आशा भोईर,सौ.कविता कोळी,कुमार म्हात्रे,सौ.मधू म्हात्रे,सौ.सविता किणी,श्री.कमलाकर नाईक,सौ.मीना म्हात्रे या सर्वांनी उपस्थित राहून व माझ्यावर विश्वास ठेऊन मला बिनविरोध उपसरंचपदी निवडून दिल्या बद्दल मी माझ्या सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो.व सरपंच आणि सर्व सदस्यांच्या सोबत राहून गावाच्या विकासात्मक कामाना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन असे नवनिर्वाचित उपसरपंच श्री.राजेश तुकाराम मुकादम यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले.
कोन ग्रामपंचायती मध्ये पक्षीय बल हे भाजपा १० ,शिवसेना ६ तर काँग्रेस १
असे असून सुध्दा शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी व सभासदांनी यावेळी सांगितले।


Bundelikhabar

Related posts

केंट वेली इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

Bundeli Khabar

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज आपण ही काम करू शकतो – सपना भोईर

Bundeli Khabar

कोपर रेलवे फ्लाईओवर जल्द ही हो सकता है शुरू ।

Bundeli Khabar
error: Content is protected !!