37.9 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » अप्पासाहेब देसाई ह्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र

अप्पासाहेब देसाई ह्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार प्रदान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पालिकेच्या शाळा बंद पडण्याची कारणे शोधताना त्यावर उपाय म्हणून पालक आणि मुलांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे परंतु त्यापेक्षाही शासनाने सरकारी आणि खासगी शाळा नीट चालल्या पाहिजेत, ह्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, नियम आणि धोरणात शिथिलता आणली पाहिजे, असे विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. महापालिका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात त्याचे वितरण शिक्षक दिनी करण्यात आले. ह्यापूर्वी हे पुरस्कार प्रकाशभाई मोहाडीकर, सरोज पाटील आदींना देण्यात आले आहेत.

शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविणारे सुप्रसिद्ध विधिज्ञ तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी गेल्या अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य केले आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इंजिनिअऱिंग, आर्किटेक्ट, अॅप्लाईड आर्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विधि असे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहे. नवनव्या संकल्पना राबवत त्यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवला आहे तसेच शिक्षकांच्या शिक्षणपद्धतीसाठीही मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मुंबै बँकेचे संचालक नंदकुमार काटकर ह्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच सुरेश डावरे पतसंस्था शिक्षकांसाठी कार्य करत असून मुंबै बँक नेहमी अशा संस्था आणि शिक्षकांच्या मागे उभे राहील, अशी ग्वाही दिली. शिक्षणाधिकारी ममता राव ह्यांनी देखील ह्यावेळी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प. म. राऊत, अजित कुंभार संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश डावरे ह्यांनी केले. सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर ह्यांनी केले तर आभार अशोक हांडे- देशमुख ह्यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related posts

न बैंड बाजा न शहनाई बगैर दहेज की अनोखी शादी

Bundeli Khabar

मोरगिरी धनगरवाडीचा विकास पुरुष हरपला

Bundeli Khabar

वयाच्या १८ व्या वर्षी आपण सज्ञानी होतो म्हणजे नक्की काय: वैष्णवी बांगरे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!