31.7 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » टीव्हीएस मोटर कंपनी प्रस्तुत करत आहे टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ प्लॅटफॉर्म
व्यापार

टीव्हीएस मोटर कंपनी प्रस्तुत करत आहे टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ प्लॅटफॉर्म

संतोष साहू/महाराष्ट्र
मुम्बई : दुचाकी व तीनचाकी वाहनांची उत्पादक, जागतिक पातळीवरील विख्यात कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आज टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) प्लॅटफॉर्म सुरु करून फॅक्टरी कस्टमायझेशन आणि पर्सनलायझेशन प्लॅटफॉर्म क्षेत्रात पदार्पण केले आहे. नवीन बिझनेस व्हर्टिकल टीव्हीएस बीटीओ प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना टीव्हीएसच्या गाड्या खरेदी करताना कस्टमाइज करून त्यांना व्यक्तिगत स्वरूप देता येणार आहे, ग्राहकांनी नोंदवलेल्या आवश्यकतांप्रमाणे थेट फॅक्टरीमधून गाडी तयार होऊन येईल. आपल्या उत्पादन विभागांमध्ये सर्वोत्तम श्रेणीचे तंत्रज्ञान आणि श्रेणीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध करवून देण्याची कंपनीची वचनबद्धता यामुळे आता अधिकच दृढ होणार आहे।


टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) प्लॅटफॉर्मवर दाखल होणारी पहिली गाडी टीव्हीएस मोटर कंपनीची प्रमुख मानली जाणारी टीव्हीएस अपाचे आरआर ३१० असणार आहे. प्री-सेट किट्स, ग्राफिक पर्याय, रिम कलर पर्याय यांबरोबरीनेच व्यक्तिगत रेस नंबर्स देखील ग्राहक निवडू शकतात. डायनामिक आणि रेस अशी नावे असलेल्या या किट्समध्ये अनेक वेगवेगळ्या अनोख्या व आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे ग्राहकांच्या गरजा व ते गाडीचा वापर कशाप्रकारे करणार आहेत त्यानुसार गाडीची कामगिरी अधिक वाढवता येते, तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार स्टायलिंग देखील करता येते. टीव्हीएस मोटर कंपनीच्या पोर्टफोलिओतील इतर गाड्यांसाठी देखील हा प्लॅटफॉर्म टप्प्याटप्प्याने उपलब्ध करवून दिला जाईल।


टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) प्लॅटफॉर्म सुरु करण्यात येत असल्याबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे हेड (मार्केटिंग) प्रीमियम मोटरसायकल्स, मेघश्याम दिघोळे यांनी सांगितले,”आमचे नवे बिझनेस व्हर्टिकल टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) सुरु होत असल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा आमचा पहिला फॅक्टरी कस्टमाइज-पर्सनलाईज प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक ग्राहकाची रायडिंगची स्टाईल आणि अभिव्यक्ती वेगवेगळी व अनोखी असते. या प्लॅटफॉर्ममुळे आता आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार आपल्या गाड्या कस्टमाइज व पर्सनलाईज करून घेता येणार आहेत.
सुपर-प्रीमियम टीव्हीएस अपाचे आरआर ३१० बीटीओ ही टीव्हीएस बीटीओवर दाखल करण्यात येणार असलेली पहिली गाडी असेल, ग्राहकांच्या आवश्यकतांनुसार गाड्या थेट फॅक्टरीमध्ये कस्टमाइज व तयार केल्या जातील. रेसिंग गाड्या निर्मितीला चार दशके पूर्ण होत असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी टीव्हीएस मोटर एक विशेष ‘रेस रिप्लिका’ ग्राफिक देखील उपलब्ध करवून देत आहे. रेसिंग गाड्यांचा खास शौक असलेल्यांसाठी टीव्हीएस रेसिंग ओएमसी रेस गाड्यांपासून प्रेरणा घेऊन हे खास ग्राफिक तयार करण्यात आले आहे.”
यामध्ये ग्राहकांना डायनामिक किट आणि रेस किट या दोन आधीपासून तयार करण्यात आलेल्या किट्समधून आपल्या आवडी व गरजांनुसार निवड करता येईल. डायनामिक किटमध्ये संपूर्णतः अड्जस्ट करता येण्याजोगे फ्रंट व रियर सस्पेन्शन असून यामध्ये प्रीलोड, रिबाउंड आणि कॉम्प्रेशन डॅम्पिंगची बहुस्तरीय अड्जस्टमेन्ट करता येते. यामुळे ग्राहक स्वतःच्या रायडिंग स्टाईलनुसार किंवा रस्ता ज्याप्रकाराचा आहे त्यानुसार सस्पेन्शन अड्जस्ट करून घेऊ शकतात.
रेस किटमध्ये अशा रेस एर्गोनॉमिक्सचा समावेश आहे ज्यामुळे ट्रॅक्सवर गाडी चालवण्याचा शौक असलेल्यांच्या खास गरजा पूर्ण होतील. या किटमध्ये अधिक जास्त प्रभावी व टक्ड इन हँडलबार, रियर सेट रेज्ड फुटरेस्ट आणि नर्ल्ड फूटपेग्स यांचा समावेश आहे. यामुळे कॉर्नर्सना अधिक लीन अँगल व अधिक चांगली स्ट्रेट-लाईन स्टेबिलिटी मिळते. या किटमध्ये अँटी-रस्ट ब्रास कोटेड ड्राइव्ह चेन देखील येते जी मोटरसायकलची स्टाईल खुलवते।


टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ प्लॅटफॉर्मवर आपली मागणी नोंदवण्यासाठी ग्राहक टीव्हीएस अराईव्ह ऍप डाउनलोड करू शकतात किंवा वेब कॉन्फिगरेटरला भेट देऊ शकतात, अशाप्रकारे त्यांना आपली मोटरसायकल कॉन्फिगर करून घेता येईल. परफॉर्मन्स किट्स, रंगांचे पर्याय आणि टायटॅनियम ब्लॅक रंगासाठी काळे किंवा लाल अलॉय व्हील्स यामधून ग्राहक आपली आवड निवडू शकतात. त्यांना आपल्या गाडीसाठी खास रेस नंबर निवडून तिला अधिक जास्त व्यक्तिगत स्वरूप देता येईल, हा रेस नंबर ग्राफिक म्हणून वायजरवर उपलब्ध असेल. याशिवाय टीव्हीएस मोटर कंपनी विशेष ‘रेस रिप्लिका’ ग्राफिक देखील उपलब्ध करवून देत आहे जे टीव्हीएस रेसिंग ओएमसी रेस मशीन्सपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे.कस्टमायजेशन पूर्ण झाल्यानंतर मोटरसायकलची एकूण एक्स-शोरूम किंमत त्यासोबतच अपडेट केली जाईल. बुकिंग रक्कम ऑनलाईन भरल्यानंतर ग्राहकांना मोटरसायकलच्या डिलिव्हरीसाठी स्वतःच्या जवळच्या प्रीमियम डीलरशिपची निवड करता येईल. आपण नोंदवलेल्या ऑर्डरचे काम कुठपर्यंत पूर्ण झाले आहे हे टीव्हीएस अराईव्ह ऍप किंवा वेब कॉन्फिगरेटरवर पाहता येईल।


ही कंपनी आपल्या टीव्हीएस अपाचे आरआर ३१० मोटरसायकल्सच्या सध्याच्या ताफ्यामध्ये अधिक जास्त वैशिष्ट्यांचा समावेश करून तो अपग्रेड देखील करत आहे. अधिक सुधारित लीन अँगल आणि अनोखी वेव बाईट की यांसोबत रेसियर एक्झॉस्ट नोट या मोटरसायकलला दिले जाईल. मोटरसायकलवरील कनेक्टेड क्लस्टरमध्ये देखील डिजिडॉक्ससारखी अनेक नवी वैशिष्ट्ये आणून ते अपडेट करण्यात आले आहे, यामुळे रायडर्सना त्यांची लायसेन्स, आरसी कार्ड्स यासारखी महत्त्वाची कागदपत्रे टीव्हीएस कनेक्ट ऍपमार्फत क्लस्टरवर स्टोर करण्याचा पर्याय मिळेल. या क्लस्टरवर डायनामिक इंजिन रेव्ह लिमिट इंडिकेटर, डे ट्रिप मीटर आणि ओव्हर स्पीड इंडिकेशन यांचा देखील समावेश असणार आहे।


ज्यांनी आधीच टीव्हीएस अपाचे आरआर ३१० खरेदी केली आहे ते ग्राहक देखील यापैकी काही वैशिष्ट्ये ऍक्सेसरीज म्हणून आपल्या गाडीसाठी मिळवू शकतात. यामध्ये रेस हँडलबार, रेस फुटरेस्ट, रेस फूटपेग आणि सॉफ्टवेयर अपडेस्ट्सच्या स्वरूपात नव्या क्लस्टर वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या ऍक्सेसरीज ते आपल्या मोटरसायकल्सवर रेट्रोफिट करून घेऊ शकतात. टीव्हीएस मोटर कंपनी शॉपमधून (मर्चंडाइज आणि ऍक्सेसरीज ई-कॉमर्स वेबसाईट) ग्राहक या ऍक्सेसरीज खरेदी करू शकतात।

Related posts

एनसीपीईडीपी और नेशनल डिसैबिलिटी नेटवर्क द्वारा नैशनल कंसल्टेशन का आयोजन

Bundeli Khabar

पेटीएम की ‘टैप टू पे’ सर्विस

Bundeli Khabar

पेपरफ्राई ने शुरू की 24 घंटे फर्नीचर डिलीवरी सेवा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!