35.3 C
Madhya Pradesh
May 21, 2024
Bundeli Khabar
Home » गोदरेज रेफ्रिजरेटर्स मध्ये नवीन कूल बॅलन्सच्या मदतीने नाशवंत गोष्टी ३० दिवसांपर्यंत ताज्या टवटवीत ठेवणार
व्यापार

गोदरेज रेफ्रिजरेटर्स मध्ये नवीन कूल बॅलन्सच्या मदतीने नाशवंत गोष्टी ३० दिवसांपर्यंत ताज्या टवटवीत ठेवणार

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : गोदरेज न्यू ईओन वेलॉर आणि गोदरेज ईओन अल्फा ही उत्पादने दोन फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मालिकेत उपलब्ध. तुमच्याकडील फळे आणि भाज्या यांची ६०% पर्यंत प्रदीर्घ साठवणूक शक्य।


लांबलेल्या उन्हाळ्यानंतर प्रमुख सुविधा उपकरणांच्या मागणीत वाढ झाल्याकारणाने गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयस कंपनीने भारतातील आघाडीचा सुविधा उपकरण उद्योग असणाऱ्या गोदरेज अॅप्लायन्सेस तर्फे गोदरेज ईओन वेलॉर आणि गोदरेज ईओन अल्फा या दोन अत्याधुनिक फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरची मालिका सादर केली आहे.
वाढत्या सुरक्षिततेच्या कारणांमुळे ग्राहक सतत दुकानांत, बाजारात जाणे टाळत आहेत. साहजिकच जास्त काळ भाज्या, फळे टिकून राहतील अशी कुलिंग सुविधा मिळण्याची गरज वाढत आहे. नवीन गोदरेज ईओन वेलॉर आणि गोदरेज ईओन अल्फा मध्ये आधुनिक एअर फ्लो रचनेद्वारा नवीन कूल बॅलन्स तंत्रज्ञान असून त्यामुळे ३० दिवसांपर्यंत ताजेपणा आणि ६०% पर्यंत दीर्घकाळ साठवणूक शक्य होणार आहे।


गोदरेज ईओन वेलॉर आणि गोदरेज ईओन अल्फा रेफ्रिजरेटर्सची काही ठळक वैशिष्ट्ये:
अ. अधिक सक्षमपणे गार होण्यासाठी ईओन वेलॉर मध्ये बहुविध इन्व्हर्टर तंत्रज्ञान
ब. बाह्य हवामान परिस्थिती नुसार ईओन वेलॉर मध्ये आपोआप कुलिंग यंत्रणा व्यवस्थित होण्यासाठी इंटेलिजंट वेदर सेन्सिंग तंत्रज्ञान
क. ताजेपणा वाढविण्यासाठी भाज्यांच्या कप्प्यात आर्द्रता नियंत्रक तंत्रज्ञान
ड. ईओन वेलॉर मध्ये एकात सहा पद्धतीने कनव्हर्टीबल फ्रीजर तंत्रज्ञान
इ. वेलॉर आणि अल्फा मध्ये अनुक्रमे २.७५ इंचेस आणि २.२४ इंचेसचे सर्वोत्तम पीयूएफ इन्श्युलेशन हे सर्वाधिक जाड इन्श्युलेशन. २४ तासांपर्यंत गार राहण्याची खात्री.
फ. संपूर्णपणे हलवता येणारा आईस मेकर यांसह भरपूर साठवणूक क्षमता असणारे रुंद फ्रीजर्स
ग. एकसारखा प्रखरपणा राहण्यासाठी प्रिझम एलइडी लाईट
घ. ईओन वेलॉर मध्ये २७ ली. आकाराचा सर्वाधिक मोठा भाज्यांचा ट्रे.
गोदरेज अॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि इव्हीपी श्री.कमल नंदी या सादरीकरणाबद्दल म्हणाले, “महामारीने ग्राहकांच्या काही सवयी बदलल्या. जसे की नाशवंत गोष्टी जास्त काळ फ्रीज मध्ये साठवून ठेवण्याची गरज वाढली. अत्याधुनिक उच्च दर्जाच्या उपकरणांची मागणीही वाढली. गोदरेज न्यू ईओन वेलॉर आणि गोदरेज ईओन अल्फा ही आमची रेफ्रिजरेटर्स मधील नवीन उत्पादने सुरक्षितता, बाह्यरूप आणि सोयीची साठवणूक क्षमता याबाबत उच्च दर्जाची असून ‘विचारपूर्वक केलेल्या गोष्टी’ या ब्रँडच्या आश्वासनाशी सुसंगत आहेत.”।


गोदरेज अॅप्लायन्सेसचे रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन समूह प्रमुख अनुप भार्गव पुढे म्हणाले, “एकूण रेफ्रिजरेटर्स विक्रीमध्ये फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्सच्या विक्रीचे प्रमाण २४% आहे आणि इतर कुठल्याही विभागापेक्षा त्यांची विक्री ४५% अधिक वेगात होते. आमची नव्याने सादर करण्यात आलेली गोदरेज न्यू ईओन वेलॉर आणि गोदरेज ईओन अल्फा ग्राहकांना चिरकाल टिकावूपणा आणि अधिक सोयीची साठवणूक या सुविधा पुरविते. रेफ्रिजरेटर्स विभागात ही नवी मालिका आमचे स्थान आणखी बळकट करेल याबाबत आम्हांला आत्मविश्वास वाटतो.”
गोदरेज न्यू ईओन वेलॉर २४४ ली., २६५ ली.आणि २९४ ली. मध्ये उपलब्ध असून ३४,७०० रुपये किंमतीपासून उपलब्ध आहे तर गोदरेज ईओन अल्फा २३४ली आणि २५३ ली. मध्ये उपलब्ध असून ३०,२०० रुपये किंमतीपासून उपलब्ध आहे।

Related posts

ट्रूक ने लॉन्च किया गेमिंग टीडब्ल्यूएस ‘बीटीजी अल्फा’

Bundeli Khabar

एनसीपीईडीपी और नेशनल डिसैबिलिटी नेटवर्क द्वारा नैशनल कंसल्टेशन का आयोजन

Bundeli Khabar

मामाअर्थ ने अपना एक्सक्लूसिव ब्रांड आउलेट फोनिक्स मॉल कुर्ला, मुंबई में लांच किया

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!