23.5 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210825 WA0026
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा माहिती अधिकारीपदी अजय जाधव तर

Bundelikhabar

ठाणे जिल्हा माहिती अधिकारीपदी अजय जाधव तर, माहिती अधिकारीपदी नंदकुमार वाघमारे रुजू

संभाजी मोरे/महाराष्ट्र

ठाणे(जिमाका) : मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहायक संचालक(माहिती) संपर्क अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. अजय जाधव यांची जिल्हा माहिती अधिकारी ठाणे या पदावर बदली झाल्याने श्री. जाधव यांनी आज दि.24 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार स्विकारला।

तसेच मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागातील सहायक संचालक(माहिती), विभागीय संपर्क कक्ष पदावर कार्यरत असलेले श्री.नंदकुमार बलभीम वाघमारे यांची बदली माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे या पदावर बदली झाल्याने श्री. वाघमारे यांनी ही आज ठाणे माहिती अधिकारी पदाचा पदभार स्विकारला।

श्री. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, कृषी, नगरविकास, मुख्य सचिव महोदय यांचे विभागीय संपर्क अधिकारी (DLO) म्हणून काम केले आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना संदर्भातील शासनस्तरावरील घडामोडी सातत्याने माध्यमांना देण्याचे काम त्यांनी केले. श्री. वाघमारे हे सार्वजनिक बांधकाम, आदिवासी, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास विभागाचे विभागीय संपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते।


Bundelikhabar

Related posts

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ गुणवंतांना प्रदान

Bundeli Khabar

मिथिला जनसेवा समिति के प्रयास से शिव मंदिर का निर्माण कार्य शुरू

Bundeli Khabar

आयग्रीडमध्ये जोरदार कर्मचारी भरती

Bundeli Khabar
error: Content is protected !!