39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » फेस्कॉम मुंबई सुगम संगीत स्पर्धेवर “स्वामी” परिवाराची छा
महाराष्ट्र

फेस्कॉम मुंबई सुगम संगीत स्पर्धेवर “स्वामी” परिवाराची छा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार, दि. १७ डिसेंबर, २०२२ रोजी फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक ज्येष्ठ नागरिक संघातील ५८ ज्येष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. श्रीमती प्रणिता शिंदे व रवींद्र जाधव हे दोघे ह्या गायन स्पर्धेचे मान्यवर परीक्षक होते.

सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सादरीकरण तोलामोलाचे झाले, त्यामुळे स्पर्धकांमध्ये डावे-उजवे ठरवणे थोडे कठीणच होते. यामध्ये परीक्षकांची पण परीक्षा होती. म्हणून समान गुण मिळालेल्या स्पर्धकांना एकच क्रमांक देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

परीक्षकांनी खालीलप्रमाणे निकाल जाहीर केले आहेत:-
प्रथम क्रमांक – कांचन गुप्ते व विश्वास डोंगरे
द्वितीय क्रमांक – दिलीप मिस्त्री व कांतीलाल परमार
तृतीय क्रमांक – लीला सपकाळ व सचिन दळवी
चतुर्थ क्रमांक – सुरेश सावंत व प्रकाश नांदोस्कर
पाचवा क्रमांक – शैलजा काळे व प्रकाश दरवेशी
उत्तेजनार्थ – रत्नप्रभा पारपिल्लेवार, गणेश करलकर, अशोक आंबुर्ले

फेस्कॉमतर्फे सर्व विजेत्यांचे अभिनंदन, तसेच सर्व स्पर्धक, परीक्षक, वादक कलाकार, ध्वनिसंयोजक, भोजन व्यवस्थापक, डी. एस. शाळेचे कार्यकारी मंडळ या सर्वांचे शरद डिचोलकर, अध्यक्ष – फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभाग आणि सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी यांनी आभार मानले आहेत.

परळ स्थित “स्वामी” ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्पर्धकांनी ह्या स्पर्धेवर आपली छाप सोडली आहे. त्यात प्रामुख्याने दिलीप (भाऊ) मेस्त्री, कांतीलाल परमार, शैलजा काळे, प्रकाश दरवेशी, गणेश करलकर, अशोक आंबुर्ले यांनी फेस्कॉमच्या स्पर्धेत यश मिळवले त्याबद्दल “स्वामी” परिवारातर्फे कार्याध्यक्ष मोहन कटारे आणि पदाधिकारी तसेच सहकार्‍यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

मराठा मोर्चाने ओलांडली महाराष्ट्राची वेस

Bundeli Khabar

केडीएमसी क्षेत्र में डिस्चार्ज हुए ८२ मरीज, मिले ३१ नए मरीज

Bundeli Khabar

बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नपूर्वक असे शालिनी सहकारी बँकेचे कार्य – अॅड. आप्पासाहेब देसाई

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!