23.6 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210817 WA00242
महाराष्ट्र

शिवसेना शाखाप्रमुख संजय वारघडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम.

Bundelikhabar

फळ झाडे व रस्त्यावरील खड्डे बुजविले.

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील जुनांदुर्खी गावातील शिवसेनेचे शाखाप्रमुख संजय वारघडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने के.एन.टावरे विद्यालय जुनांदुर्खी(लाखीवली) येथील शालेय मैदाना मध्ये लावण्यासाठी ३० फळझाडे स्व:खर्चात उपलब्ध करून दिली.त्याचप्रमाणे भिवंडी-पारोळ महामार्गावरील जुनांदुर्खी- कांबे गावातील मुख्य रस्त्यावरील खड्डे स्व:खर्चात बुझविण्यात आले आहेत.त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी व जुनांदुर्खी गावातील ग्रामस्थांनी शाखाप्रमुख संजय वारघडे यांचे विशेष आभार व्यक्त केले.त्याचप्रमाणे के. एन. टावरे विद्यालयातील मुख्याध्यापक कारभारी सर यांनी संजय वारघडे यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले।


याप्रसंगी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अंकुश पाटील,शिवसेना शाखाप्रमुख संजय वारघडे, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दत्ता भाऊ शिकारी ,शिवसेना उपशाखाप्रमुख राजेश पाटील,माजी पंचायत समिती सदस्य .बबन पाटील, शिवसेना विभागप्रमुख चंद्रकांत पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव राजेश जाधव, पत्रकार तथा कांबे जिहा परिषद गटाचे संपर्क सचिव राजेंद्र पाटील, चंद्रकांत कडव, समाजसेवक विकास पाटील ,लीलाधर पाटील, गजानन शिकारी, हरीभाऊ म्हात्रे, नारायण पाटील, सुदाम शिकारी, यशवंत ठाकरे, देवराज पाटील, गणेश शिकारी ,दौलत चौधरी,तुकाराम चौधरी व नरेंद्र गोराडकर उपस्थित होते।


शिवसेनेचे शाखाप्रमुख .संजय वारघडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि,समाजात राहत असताना आपण समाजाच काही तरी देण लागतो ही संकल्पना मनात ठेवून हे उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने राबविले आहेत.जिथे जिथे मला या गावासाठी, समाजासाठी जे जे काही कार्य करता येईल ते ते करण्याचा माझा प्रयत्न असेल.कोणतेही कार्य करताना ८०℅ समाजकारण व २०% राजकारण हे सुत्र लक्षात ठेऊन कार्य करत असल्याने गावातील नागरिकांचा ही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो।

IMG 20210817 WA00243

Bundelikhabar

Related posts

मुरबाड येथील जांभूर्डे गावी पोषण माह अभियानाचा सोहळा उत्साहात संपन्न

Bundeli Khabar

वसंतदादा पाटील शिक्षण संकुलात रोजगार मेळाव्याचे आयोजन

Bundeli Khabar

परहित चेरिटेबल सोसायटी के अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता द्वारा राशन वितरित

Bundeli Khabar
error: Content is protected !!