36 C
Madhya Pradesh
April 28, 2024
Bundeli Khabar
Home » टीसीएलने नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च केले
व्यापार

टीसीएलने नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च केले

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : टीसीएलने आपला ४०वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च करत असल्याची घोषणा केली. टीसीएल हा आघाडीचा कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असून काही अत्याधुनिक तंत्रज्ञान अविष्कार दर्शवणारी उत्पादने बाजारात आणून त्यांनी या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. नवीन ऑनलाइन ब्रँड स्टोअरमध्ये नवी उत्पादने, कार्यक्रम, आगामी उत्पादने आणि बऱ्याच गोष्टींची माहिती मिळण्याकरिता कंपनीने ग्राहकांना या वेबसाइटला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. यासोबतच ब्रँडने ग्राहकांसाठी इतर अनेक प्रोग्राम आणि उपक्रमांचीही घोषणा केली आहे.
टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन यांच्या मते, “ ग्राहकांना नवा आणि यूझर-फ्रेंडली अनुभव प्रदान करणे हाच वेबसाइटची पुनर्रचना करण्यामागचा मुख्य हेतू आहे. ४०वा वर्धापन दिन हा ब्रँडसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण त्यासोबतच ही एक नवी सुरुवात देखील आहे. ग्राहककेंद्रित उत्पादने आणि सेवा वितरित अधिक उच्चतम उद्दिष्ट गाठण्याच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. भारतीय ग्राहकांनी नेहमीच आम्हाला पाठींबा दिला आहे आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आहे।

Related posts

फिनटेक स्टार्टअप ‘पेटेल’ची १.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

Bundeli Khabar

वैलेंटाइन्स डे की शान बढ़ाएंगे ‘कल्याण’ के अनूठे आभूषण

Bundeli Khabar

आयएसएफसी आणि क्रिसलिस यांच्यात सामंजस्य करार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!