27.1 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210824 WA0032
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

Bundelikhabar

किशोर पाटील / महाराष्ट्र
मुंबई : नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली।


केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे।


पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे।


नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे।


Bundelikhabar

Related posts

जैन हत्याकांड में आरोपी को जल्द गिरफ्तार करने की उठी मांग

Bundeli Khabar

A series of 85 books by Dr. P. Sekhar on the assessment of States and Union Territories in India

Bundeli Khabar

संकल्पचा बाल मेळावा मोठ्या उत्साहात

Bundeli Khabar
error: Content is protected !!