22.4 C
Madhya Pradesh
September 3, 2026
Bundeli Khabar
IMG 20210821 WA0014
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष सावर्डेकर लोकसेवेसाठी सरसावले

Bundelikhabar

संभाजी मोरे/महाराष्ट्र
चिपळूण : सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष सावर्डेकर यांच्या पुढाकाराने गेल्या काही दिवसात दीप जनसेवा समिती मुंबई व चिवेली येथील साळुंखे परिवार तसेच रोशनी फाउंडेशन आणि एज्युकेशनल ट्रस्ट चिपळूण यांच्या माध्यमातून काडवली येथील रोहिदासवाडी, बौद्धवाडी कांगणेवाडी, हुमणेवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. याबद्दल येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे।

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष सावर्डेकर गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असताना सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. कोरोना कालावधीत अनेकांचे रोजगार बुडाले तर ग्रामीण भागात देखील ग्रामस्थांना समोर अनेक प्रश्न उभे राहिले. तर आता महापुराचा शहरांसह ग्रामीण भागाला देखील फटका बसला आहे।

कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन दिप जनसेवा समिती मुंबई व साळुंखे परिवाराच्या माध्यमातून संतोष सावर्डेकर यांनी काडवली रोहिदासवाडी, बौद्धवाडी व कांगणेवाडी तसेच चिपळूण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या माध्यमातून आंबडस रोहिदासवाडी येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून दिलासा दिला. तर आता महापूर परिस्थिती लक्षात घेऊन नुकतेच रोशनी फाउंडेशन आणि एज्युकेशनल ट्रस्ट चिपळूण, यांच्या माध्यमातून काडवली हुमणेवाडी येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप सहकार्याचा हात दिला. तर पुढील काळात देखील आपली लोकसेवा अशीच सुरू राहील अशी ग्वाही संतोष सावर्डेकर यांनी दिली आहे. याचबरोबर मूलभूत सुविधा देखील ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत।


Bundelikhabar

Related posts

‘मेजर’ के लिए वाहवाही बटोर रहे हैं अदिवि शेष

Bundeli Khabar

बोरिवली खादी महोत्सव 2022 में स्वदेशी फैशन के नए डिज़ाइन की धूम

Bundeli Khabar

जुहू बीच को स्वच्छ बनाने के लिए सनटेक फाउंडेशन की मुहिम

Bundeli Khabar
error: Content is protected !!