19.8 C
Madhya Pradesh
September 19, 2024
Bundeli Khabar
Home » स्वातंत्र्याची जाणीव करून देणारा अनोखा स्वातंत्र्यदिन
महाराष्ट्र

स्वातंत्र्याची जाणीव करून देणारा अनोखा स्वातंत्र्यदिन

अनेक सामाजिक संस्था एकत्र येऊन साजरा केला स्वातंत्र्यदिन

सामाजिक उपक्रमांनी कुंडाचापाडा येथे साजरा झाला ७५ वा स्वातंत्र्यदिन

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र

जव्हार : स्वातंत्र्यदिनानिमित्त कुंडाचापाडा येथे मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉ.दिपेश पष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई सोशल ग्रुप च्या अनिता सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा सामर्थ्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष मुकेश वातास, अँटी कोरोना टास्क फोर्स चे सदस्य व सर्वोत्तम सामाजिक कार्यकर्ते दिवेश पष्टे यांच्या सहकार्याने परिसरातील २०० कुटुंबांना धान्य, कपडे, मास्क व १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मास्क आणि खाऊ वाटप करण्यात आले।


देशाला पारतंत्र्यातून मुक्तता मिळाल्या नंतरही देशाचा काही भाग विकासापासून वंचित असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्षानंतरही ग्रामीण जनतेला आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये ग्रामीण जनता मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठीची धावपळ व खिशात पैसा नाही अशा परिस्थितीत ग्रामीण जनता आपल्या आयुष्याशी दोन हात करत आहे. नेमके हेच लक्षात घेऊन ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठान, सर्व सामान्य जनतेचे हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे आपले मानवाधिकार फाऊंडेशन आणि मुंबई सारख्या शहरी भागात राहणाऱ्या परंतु ग्रामीण भागातील गरीब जनतेची जाणीव असणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई भरारी सोशल ग्रुप व मानिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी जिल्हा असणाऱ्या पालघर जिल्ह्यात अतिशय गरीब आणि गरजू कुटुंबांना कोरोना काळात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कशा प्रकारे हात देता येईल या उद्देशाने राज्याच्या नकाशावर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार तालुक्यातील कुंडाचापाडा या आदिवासी पाड्यात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना धान्याची कीट देऊन पोटाची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. या कीट मध्ये तूरडाळ, आटा, खाद्यतेल, रवा, साखर तसेच शालेय विद्यार्थ्यांना कोरोना काळात सुद्धा शिक्षणात खंड पडू नये व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून जि.प.शाळेच्या मुलांना वह्या, खोडरबर, पेन्सिल, पेन, शार्पनर, रंगीतखडू आणि बिस्कीट/कॅटबरी असे सामान देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.
त्याचप्रमाणे स्थानिक विधवा/गरीब महिलांना मास्क, साड्या, मुलींना ड्रेस, लहान मुलांचे कपडे अशा प्रकारे ग्रामीण गरीब कुटुंबांना जगण्यासाठी त्यांचा संसाराचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला. या सामाजिक उपक्रमा वेळी युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या संस्थापकांनी ग्रामीण भागातील गरीब जनता सुखसोई पासून कशी वंचित आहे, त्यांना जगण्यासाठी कशी धावपळ करावी लागते हे पटवून दिले. क्रांतिज्योती सावित्रीबाई भरारी सोशल ग्रुपच्या संचालिकांनी गेल्या दोन वर्षा पासून कोरोना महामारीत ग्रामीण जनता कशी हैराण आहे हे लक्षात घेऊन शहरातील महिलांना एकत्र करून सोशल ग्रुप बनवून आपल्या कडून शक्य होईल तशी मदत कशी करता येईल याची प्रचिती दिली. आपले मानवाधिकार फाऊंडेशनच्या संस्थापकांनी आपल्या फाउंडेशन मार्फत ग्रामीण आणि गरीब जनतेचे मूळ अधिकार कसे मिळवून देता येतील याचे प्रामाणिक प्रयत्न करू असे प्रतिपादन केले।


या सामाजिक उपक्रमा प्रसंगी तिन्ही सामाजिक संस्था तसेच मानिनी फाउंडेशन एकत्र आल्याने कोरोना काळात सुध्दा स्थानिक जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारे समाधान स्पष्ट दिसत होते. या कार्यक्रमा प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई भरारी सोशल ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्षा अनिताताई सातपुते, युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश वातास, आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉ. दिपेश पष्टे तिन्ही संस्थेचे सदस्य आणि पदाधिकारी, तसेच सर्वोत्तम सामाजिक कार्यकर्ता पुरस्कृत युवा समाजसेवक दिवेश पष्टे, पत्रकार इम्रान कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते/पत्रकार मनोज कामडी, शिक्षक संघटनेचे सरचिटणीस भूपेंद्र चातुर्य, स्थानिक जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका/सहशिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष मिलिंद खरात, तालुका अध्यक्ष राजू ठाकरे, कल्पेश पष्टे, विवेक पष्टे, वातास मॅडम तसेच शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते


स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातील काही भाग अविकसित असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या भरपूर सुविधा असताना सुद्धा सामान्य जनतेपर्यंत त्या प्रत्यक्षपणे पोहचत नाहीत. या सर्व बाबींचा पाठपुरावा करून शासनापर्यंत पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक संघटनांच्या वतीने जनतेला सहकार्य, मदत व मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सहकाऱ्यांच्या मदतीने करत आहोत।

Related posts

भिवंडी तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग घोषित करून दर्जेन्नोत करण्याबाबत मनसे ने केली मागणी

Bundeli Khabar

अखिल भारतीय अग्निशिखा मंच के तत्वावधान में एक सौ दसवाँ ऑनलाइन कवि सम्मेलन सम्पन्न

Bundeli Khabar

राय बंधुओं को मिला साहित्य अकादमी पुरस्कार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!