26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA0006
महाराष्ट्र

मौजमजेसाठी अविवाहित मुलींनी शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोहोचला नाहीय :मे.उच्च न्यायालय

Bundelikhabar

संजिव चौधरी/महाराष्ट्र

मध्य प्रदेश मे.उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर यांनी बलात्काराच्या प्रकरणामध्ये जामीन अर्ज फेटाळताना भारतीय समाजाबद्दल मत व्यक्त केलं आहे
लग्न न झालेल्या मुली लग्नाचं आश्वासन न मिळता केवळ मौजमज्जा म्हणून शरीरसंबंध ठेवतील।
,एवढ्या पातळीवर भारतीय समाज अजून पोहोचलेला नाही,
असं न्या. अभ्यंकर यांनी म्हटलं आहे।
“भारत हा पुराणमतवादी समाज आहे।
भारत अजून सामाजिक विचारसरणीमध्ये त्या स्तरावर पोहोचला नाहीय जिथे कोणत्याही धर्माची अविवाहित मुलगी केवळ मज्जा म्हणून मुलासोबत शारीरिक संबंध ठेवेल.।
लग्नाचं किंवा भविष्यासंदर्भात काही आश्वासन दिलं असेल तर अशा गोष्टी घडू शकतात।
मात्र प्रत्येक वेळेस पीडितेने आत्महत्याचा प्रयत्न करण्याची गरज नसते,”
असं मे.न्यायालयाने म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना मे.न्यायालायने शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेण्याआधी मुलानेही त्याचे परिणाम होतील याची जाणीव ठेवली पाहिजे आणि काही अनपेक्षित झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे असंही म्हटलं आहे.
“अशा प्रकरणांमध्ये कायम मुलीलाच त्रास सहन करावा लागतो कारण गरोदर राहण्याची आणि या नात्याबद्दल समजलं तर समाजाकडून बोल लावले जाण्याची भीती तिला असते.
मात्र मुलांनीही होणाऱ्या परिणामांचा विचार करुन त्याला तोंड देण्यासाठी तयार असलं पाहिजे.
केवळ संमतीने शरीरसंबंध ठेऊन नंतर तुम्ही तिला सोडू शकत नाही,”
असंही मे.न्यायालयाने म्हटल्याचं बार अॅण्ड बेेंचने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
मे.न्यायालयामध्ये ज्या प्रकरणाची सुनावणी झाली त्यामध्ये आरोपी मुलाने लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर बलात्कार केल्याचा खटला होता।


Bundelikhabar

Related posts

कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये,राजकारणी असो किवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच-खा. श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar

जाणून घ्या अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल – डॉ सुहास आग्रे

Bundeli Khabar

केंद्र सरकारच्या आरोग्ययोजने अंतर्गत कल्याण अथवा डोंबिवली येथे (CGHS) आरोग्य केंद्राच्या स्थापनेची अधिवेशनाच्या शून्य प्रहर काळात आग्रही मागणी

Bundeli Khabar
error: Content is protected !!