29.8 C
Madhya Pradesh
May 4, 2024
Bundeli Khabar
Home » इन्फिनिक्सने लाँच केला ‘स्मार्ट ५ए’ जिओ प्राइस सपोर्टसह फ्लिपकार्ट वर उपलब्ध
व्यापार

इन्फिनिक्सने लाँच केला ‘स्मार्ट ५ए’ जिओ प्राइस सपोर्टसह फ्लिपकार्ट वर उपलब्ध

मुम्बई / जितेंद्र शर्मा
मुंबई : स्मार्ट सिरीजचा वाढता प्रतिसाद आणखी विस्तारण्याकरिता, बिग स्क्रीन आणि बिग बॅटरीचा वारसा जपत, इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपच्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने, भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओसोबत भागीदारी केली असून याद्वारे सर्वोत्कृष्ट पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन- स्मार्ट ५ए लाँच केला आहे. या डिव्हाइसमध्ये मोठी ५००० एमएएच बॅटरी क्षमता, मोठा ६.५२ एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले, अधिक चांगला सेल्फी कॅमेरा आणि इतर बऱ्याच या श्रेणीतील फर्स्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच जिओची एक्सक्लुझिव ऑफरही यासोबत दिली जाईल।


नव्या स्मार्ट ५ए मध्ये आकर्षक पिरॅमिड आकाराचे डिझाइन बॅक पॅनलवर देण्यात आले आहे. ग्राहकांना केवळ ६,४९९ रुपयांच्या प्राथमिक किंमतीत स्टायलिश स्मार्टफोनचा अनुभव मिळेल. हा फोन फ्लिपकार्टवर ओशिअन वेव्ह, क्वेटझल सायन आणि मिडनाइट ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. जिओसोबतच्या भागीद्वारे ग्रहाकांना ५५० रुपयांचा अतिरिक्त सपोर्ट देण्यात आला असून याद्वारे लाँचिंगची किंमत ६ हजारांपेक्षाही कमी होईल।


या डिव्हाइसच्या भव्य ५००० एमएएच बॅटरी बॅकअपला पॉवर मॅरेथॉन सुविधेचा आधार आहे. यामुळे ३५ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळतो. म्हणून यूझर्सना २३ तासांपर्यंत व्हिडिओ अखंडपणे पाहता येतात. २५ तास संगीत ऐकता येते, ३३ तास नॉन स्टॉप ४जी टॉक टाइम आणि १२ तास वेबसर्फिंग व १४ तासांचे गेमिंग करता येते. स्मार्ट ५ए मध्ये एक्सओएस ७.६ स्किनसह नवी अँड्रॉइड ११ प्रणाली आहे. त्याला १२ एनएम हेलिओ ए२० क्वाड-कोअर प्रोसेसर, २ जीबी रॅम/ ३२ जीबी स्टोरेजची सुविधा आहे. या श्रेणीत ही सुविधा प्रथमच देण्यात आली आहे.
स्मार्ट ५ए मध्ये ८ एमपी ड्युएल रिअर कॅमेरा असून त्यात ट्रिपल एलईडी फ्लॅश आहेत. यात एफ/२.० लार्ज अपार्चर आणि १८ विविध एआय सीन डिटेक्शन मोड्स आहेत. याद्वारे सीन ओळखले जातात आणि सूक्ष्म बारकाव्यांसह स्पष्ट फोटो घेण्याकरिता सर्व पॅरामीटर्स अडजस्ट केले जातात. फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगकरिता रिअर कॅमेऱ्यात एआय एचडीआर मोड, बोक मोड, एआय थ्रीडी ब्युटी मोड आणि पॅनोरमा मोड आहेत।


स्मार्टफोनमध्ये वर्धित सुरक्षेकरिता फिंगरप्रिंट सेंसर/ फेस अनलॉक सुविधा तसेच ड्युएल व्होलटीई सुविधा आहे. याद्वारे दोन ४ जी सिमकार्ड आणि व्होवायफाय अखंडपणे, अडचणीशिवाय आपोआप बदलले जातात।

Related posts

फॉक्सवैगन इंडिया ने लॉन्च किया टिगुआन

Bundeli Khabar

दुनिया भर के बाजारों के लिए उत्पाद नवाचार को गति देने हेतु मलेशिया में हर्षे ने खोला नया शोध एवं विकास केंद्र

Bundeli Khabar

झूमकारचा आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार इजिप्त आणि फिलिपाइन्समधील कंट्रीहेडची नियुक्ती जाहीर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!