28.5 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » करदात्या नागरिकांचा अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त
महाराष्ट्र

करदात्या नागरिकांचा अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त

मुम्बई / संदीप शेंडगे
मोहोणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील खड्डे दुरुस्तीच्या कामास भरपावसात सुरुवात सुरुवात सुरुवात केली आहे.
संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरातील रस्ते खराब झाले असून अ प्रभाग क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते दुरुस्तीची अनेकदा कल्याण-डोंबिवली महानरपालिकेकडे मागणी करूनही खड्डे दुरुस्तीकडे प्रशासन लक्ष देत नव्हते।

यह भी देखें-एक ही थाने में पिछले 8 सालों से जमे आरक्षक के खिलाफ लोगों ने दिया ज्ञापन

परंतु दोन दिवसापासून भर पावसात खड्ड्यांमध्ये मोठमोठी खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खड्ड्यांमध्ये टाकलेल्या खडीमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खडी ही खड्ड्यात भरून न राहता पुन्हा खड्ड्याच्या बाहेर पडत असून खड्डे जसेच्या तसेच आहेत. याउलट टाकलेल्या खडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खड्डे बुजवताना टाकण्यात आलेल्या टोकदार दगडामुळे अनेक वाहने पंक्चर झाले तर अनेक ठिकाणी मोठ्या टायर मधून दगड उडून वाहनांना लागत आहेत दुचाकी आणि रिक्षा मधून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या टायर मधून दगड उडून वाहनांना लागत आहेत. आर. एस. येथे राहणारे रामा शिंदे यांना खडी उडून पायाला लागून जखम झाली आहे. त्यामुळे टाकलेली खडी हे खड्डे बुजविण्याचे काम कमी आणि इतरांना दुखापत करण्याचे कामच जास्त करीत आहे. असा आरोप नागरिक करीत आहेत. खड्डे दुरुस्ती बाबत अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांना नागरिक फोनवरून तक्रार करीत असताना राजेश सावंत मात्र नागरिकांचे फोन उचलत नसल्याचे स्पष्ट झाले आहे।
खड्डे दुरुस्ती करावी परंतु चांगल्या पद्धतीने करावी नागरिकांच्या पैशाचा अपव्यय करू नये असे या वेळी नागरिकांनी बोलताना सांगितले।

Related posts

अनुराधा कुबेर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर

Bundeli Khabar

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गिरणी कामगार प्रश्नावर अनुकूल! सचिन अहिर यांनी काल भेट घेतली वर्षावर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!