33.7 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा
महाराष्ट्र

चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

मुंबई / ब्यूरो
टिटवाळा : राजे ग्रुप टिटवाळा, ब्रदर्स ग्रुप कल्याण आणि सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू जमा करून आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी चिपळूण तालुक्यात पाठवण्यात आल्या।


गेल्या 10 दिवसांपासून टिटवाळा, वासिंद, कल्याण या परिसरातील नागरिकांना चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू दान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या सभासदांकडे जमा केल्या. दोन दिवस संस्थेचे कार्यकर्ते सर्व साहित्य एकत्र करून प्रत्येक कुटंबाला देण्यासाठी पॅकेट्स तयार करत होते. सुमारे 1 टेम्पो भरून जीवनावश्यक वस्तू आज चिपळूण येथे रवाना करण्यात आल्या।


संकटात असलेल्या आपल्या कोकणी बांधवांसाठी मदतीचा छोटासा प्रयत्न प्रत्यक्षात कोकणात जाऊन करण्यात आला. टिटवाळयातील राजे ग्रुप, ब्रदर्स ग्रूप, बल्लाळेश्वर सोसायटी, अमृतसिद्धी संकुल, सिद्धीविनायक युवा संस्था, गणेश गायकवाड, नावशेठ भोय, राजन जोशी, अमित राममाने, मनोहर सरनोबत यांच्या वतीने हि छोटीशी मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात आली।

Related posts

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना

Bundeli Khabar

MNS प्रमुख राज ठाकरे हुए कोरोना संक्रमित, मां की भी रिपोर्ट आई पॉजिटिव, घर में चल रहा इलाज

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री नारायण राणे के बयान को लेकर पूरे महाराष्ट्र में आंदोलन शुरू

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!