34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » मातामृत्यू रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल
देश

मातामृत्यू रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

मातामृत्यू रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल
जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग घेतंय गरोदर,स्तनदा मातांची काळजी*
गरोदर, स्तनदा स्त्रियांसाठी टेस्ट, ट्रीटमेंट आणि टॉक या त्रिसूत्रीचा वापर
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची संकल्पना

ठाणे / प्रमोद कुमार
ठाणे : ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने महत्वाचे पाऊल उचलले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने मातामृत्यू रोखण्यासाठी गरोदर, स्तनदा मातांची टेस्ट, ट्रीटमेंट करण्याबरोबर महिलांशी आरोग्यदायी संवादही (टॉक) साधला जाणार आहे. आज या उपक्रमाची सुरुवात शहापूर तालुक्यात करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरसच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके यांनी गरोदर माता, स्तनदा माता, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याशी आरोग्यदायी संवाद साधला।

यह भी पढ़ें-बुलेट रायडर्स चे नंदनवन लेह लडाख

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहापूर गट विकास अधिकारी अशोक भवारी यांच्या नेतृत्वाखाली शहापूर आरोग्य विभागाने अति जोखमीच्या गरोदर मातांच्या तपासणीसाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार केला असून मातामृत्यू रोखण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. या मोहीमेचा पहिला टप्पा दिनांक २८ जुलै २०२१ पासून सुरू झाला आहे. यामध्ये ८ ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबीन (रक्त) असलेल्या ७२ अतिजोखमीच्या गरोदर मातांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून एकाच दिवशी उपकेंद्र स्तरावर संपूर्ण तपासणीनंतर निष्कर्षाची पाच टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये रक्त वाढीच्या गोळ्यांची आवश्यकता ,इंजेक्शनची आवश्यकता, आयरन सुक्रोस किंवा ब्लड ट्रान्स फ्युजन तसेच मोठे आजार असलेल्या माता आदी निष्कर्ष निहाय विभागणी केली जाणार आहे।


या आहेत तपासणी तारखा
या तपासणीत स्त्री रोगतज्ञ यांच्या विशेष उपचाराची गरज असलेल्या गरोदर मातांसाठी मोहीम संपल्यानंतर विशेष शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये दिनांक २८ जुलै रोजी उपकेंद्र आवाळे येथे ११ गरोदर मातांची स्त्री रोग तज्ञा मार्फत तपासणी केली गेली.
तसेच दिनांक २९ जुलै २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंद कार्यक्षेत्रातील गरोदर मातांची तपासणी *स्त्री रोग तज्ञा मार्फत केली जाणार आहे.त्याचबरोबर दिनांक ३१जुलै २०२१ रोजी
प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे स्त्रीरोग तज्ञ मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभा ,अघई व कसारा येथील गरोदर मातांची तपासणी केली जाणार आहे।

दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी
प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा येथे स्त्रीरोग तज्ञ मार्फत डोळखांब, टाकीपठार ,किन्हवली, शेंद्रूण व शेणवा येथील गरोदर मातांची तपासणी केली जाणार आहे. स्त्री रोग तज्ञ यांची तपासण्याची वेळ *दुपारी २ ते संध्याकाळी ५* वाजेपर्यंत राहणार आहे. गरोदर मातांची ने-आण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन उपलब्ध करण्यात येणार आहे.
महिलांना मिळणार अमृत आहार व समतोल आहार,महिला व बाल विकास विभागाकडून या गरोदर मातांना अमृत आहार व समतोल आहार दिला जात आहे.प्रसूती होईपर्यंत आणि त्यानंतरही या महिलांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Related posts

विश्व में भगवान सूर्य का इकलौता मंद‍िर, ज‍िसका दिव्य दरवाजा पूरब नहीं पश्चिम की ओर खुलता है

Bundeli Khabar

बुन्देली ब्रेकिंग: दिन भर की टॉप10 खबरों पर एक नज़र

Bundeli Khabar

संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर महाराज जी हुए समाधि में लीन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!