24.3 C
Madhya Pradesh
September 24, 2023
Bundeli Khabar
IMG 20230501 WA0024
महाराष्ट्र

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शिष्यवृत्तीधारकांच्या कार्यक्रमाचे आयोजन

9 / 100

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि नृत्य यासाठी विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ६ मे आणि रविवार दिनांक ७ मे या दिवशी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यात सहभागी गायकांना तबला साथ प्रवीण करकरे यांचे शिष्य आणि केंद्राचे शिष्यवृत्तीधारक यज्ञेश कदम आणि निनाद कुणकवळेकर करणार असून हार्मोनियमची साथ ओंकार अग्निहोत्री आणि शुभदा गायकवाड यांची असेल.

शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी १० ते १.३० या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य (गुरु – स्नेहल कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितुत – गायन (गुरु – वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर), अदिती पोटे – गायन – (गुरु – अपूर्वा गोखले) हे कला सादर करतील तर रविवार दिनांक ७ मे संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात सावनी पारेकर – ख्याल गायन (गुरु – पल्लवी जोशी), आर्या धारेश्वर – गायन (गुरु – यशस्वी सरपोतदार), प्राजक्ता शेंद्रे – गायन (गुरु – श्रीमती पल्लवी जोशी), सावनी गोगटे – गायन – गुरु (पं. शुभदा पराडकर) यांची कला सादर होईल.

Related posts

करीरोड येथील कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांच्या तसबीरीचे अनावरण

Bundeli Khabar

मिठी नदीवर तरंगणा-या कच-याची लागणार विल्हेवाट

Bundeli Khabar

शातिर आरोपी पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!