40.1 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या विन्स पाटील यांची सुवर्ण कामगिरी
खेल

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या विन्स पाटील यांची सुवर्ण कामगिरी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवछत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बॉक्सिंग हॉल, बालेवाडी, म्हाळुंगे, पुणे येथे दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत विन्स पाटील याने पॉईंट फाईट या प्रकारात -८४ किलो या वजनी गटात महाराष्ट्राला तसेच मुंबई शहराला सुवर्ण पदक मिळवून दिले.

या अगोदर विन्सने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. शितो रीयु स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन, सलग्न – स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या संस्थेत विन्स बालपणापासून प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक उमेश मुरकर व विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विजयी घौडदौड सुरू आहे. वाको इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा त्याचा मानस आहे. वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल व किक बॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी विन्सला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मुंबई शहर संघाचे विजयी स्पर्धक – सुवर्ण पदक – विन्स पाटील, रौप्य पदक – रेवा सक्सेना, झैनाब बरोत, कांस्य पदक – समर्थ सावंत, तेजस व्हटकर, अलीअसगर सुटेरवाला, सहभाग – आयमान मकानी, आदी पिसोलकर

Related posts

टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचा २९ धावांनी विजय

Bundeli Khabar

इंग्लंडने १० गडी राखून केला भारताचा दारूण पराभव

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अखेर चेन्नईला विजय गवसला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!