22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » सात्यकी सावरकर यांना विधानपरिषदेवर सदस्यत्व देण्याची राज्यपालांकडे मागणी
महाराष्ट्र

सात्यकी सावरकर यांना विधानपरिषदेवर सदस्यत्व देण्याची राज्यपालांकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांना विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय विचार परिषदेच्या वतीने लेखी निवेदने पाठवून करण्यात आली आहे.

सात्यकी सावरकर उच्चविद्याविभूषित असून सॉफ्टवेअर अभियंता आहेत. त्यांना स्वातंत्र्यवीरांचा वैचारिक वारसा असून हिमानी सावरकर यांचे ते सुपुत्र आहेत. अभिनव भारत चळवळ त्यांनी जवळून पाहिली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्याचे केवळ अभ्यासक नाही तर वैचारिक पातळीवर त्यांचे विचार अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या साहित्याची धुरा स्नुषा हिमानी सावरकर यांच्यावर सोपविली आणि त्यांच्या पश्चात ही जबाबदारी सात्यकी यांच्यावर असून ते देशभरातील विविध संस्थांना साहित्य प्रकाशन निर्मितीत सहकार्य करत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या सर्व गटांमधील संस्था, संघटनांशी त्यांचा एकोपा असून त्यांच्यात सात्यकी यांच्याबद्दल सकारात्मकता आहे. अशावेळी त्यांना विधानपरिषदेवर सदस्यत्व मिळाल्यास या सर्व सावरकर प्रेमींचे ते प्रतिनिधी ठरतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. याबाबत सावरकरप्रेमी नागरिक व संस्थांचे प्रतिनिधी सात्यकी सावरकर यांची भेट घेऊन त्यांनादेखील यासाठी आग्रह करणार आहेत.

Related posts

बिजली चोरी के मामले में तीन लोगों के खिलाफ शिकायत दर्ज

Bundeli Khabar

कोरोना काळात पडद्यामागून आपण सरकारला मोलाची साथ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार – महेश चौघुले

Bundeli Khabar

प्रशासन आणि प्रसार माध्यमे यांच्यात सुसंवाद अत्यावश्यक :प्रसन्न जोशी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!