22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे सामना पावसामुळे वाहून गेला
महाराष्ट्र

दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे सामना पावसामुळे वाहून गेला

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सोमवारी होबार्ट येथे वाहून गेला. पावसामुळे उशिराने सुरू झालेला सामना ९ षटकापर्यंत मर्यादित करण्यात आला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात २३ धावा करत दक्षिण आफ्रिकेला बळकट केले. पण पुन्हा पाऊस आला. थोड्या विश्रांतीनंतर, पावसाचा जोर कमी झाला पण २ षटके गमावली आणि दक्षिण आफ्रिकेला ७ षटकांत ६४ धावांची गरज होती. तिसर्‍या षटका अखेरीस सामना जेव्हा थांबला तेव्हा क्विंटन डी कॉकने केवळ १८ चेंडूंत नाबाद ४७ धावा काढल्या होत्या. सरतेशेवटी पाऊस पुन्हा आला, ज्यामुळे सामना वाहून गेला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ अंक मिळाला.
तत्पूर्वी, सामन्यात झिम्बाब्वे एका क्षणी केवळ १९ धावांत ४ विकेट गमावून अडचणीत सापडला होता, परंतु वेसली मधवेरे आणि मिल्टन शुम्बा यांच्या पाचव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीने त्यांच्या गोलंदाजांना सामना वाचवण्यासाठी बळ दिले. त्यामुळे सामन्यात ७९/५ अशी मजल त्यांनी मारली.

Related posts

मोहने येथील अनधिकृत बांधकामाला आशीर्वाद कोणाचा

Bundeli Khabar

विकलांग युवाओं के लिए समर्थनम ट्रस्ट का चौथा रोजगार मेला

Bundeli Khabar

भुजबळांनी भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला तर येवल्याचा विकास झाला समजू

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!