23.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220911 WA0024
महाराष्ट्र

मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : करीरोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील कवी, लेखक शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. ‘कल्पनेतून जग निर्माण झाले’ या कवितेनं जग बदलले असे विचार मांडणारे शिक्षणाधिकारी राजेशजी कंकाळ त्यांच्या स्वरचित कवितेत म्हणतानाच ‘माणसातला माणूस असा घडवत जाते कवितेतून खदखदून हसवताना नकळत डोळ्यातून अश्रू येणे भाग पाडतात. कंकाळ सरांच्या या कवितेनं रसिक श्रोत्यांना अंतर्मुख करत सभागृह जिंकून घेतलं.

शिक्षणाधिकारी राजू तडवी (मध्यवर्ती) यांनी हरीवंशराय बच्चन यांची कविता ऐकवून अभिजात कवितेचा अनुभव रसिकांना दिला. या अनोख्या कार्यक्रमाचे संयोजक मनपा अधीक्षक निसार खान यांनी शिक्षण विभागात कार्यरत कवी, शायर, लेखक ज्यांनी देशभर नाव कमावलं आहे त्यांचा उचित सन्मान व्हावा या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे, कविसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.

संपूर्ण कार्यक्रमाचे देखणे बहारदार सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी किसन पावडे पाटील यांनी करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपशिक्षणाधिकारी रविंद्र काळे यांनीही स्वत:ची कविता ऐकवत कविसंमेलनाला अधिक उंचीवर नेत चार चांद लावले. ७०हून जास्त कवींनी नाव नोंदणी केलेल्या या कार्यक्रमात बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, कवयित्री विद्या प्रभु, कवी अरविंद पवार, हिंदी माध्यमातील सुरेश मिश्रा, भारती श्रीवास्तव, पूर्णिमा पांडे, उर्दूचे मकसद आफाक, मोहसिन साहिल, वसीम अकील शाह यांनी कविता सादर करून सभागृहाची दाद मिळवली. हशा-टाळ्यांनी सभागृह दणाणले. सर्व कवींना शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी अजय वाणी यांचा त्यांच्या सहा पुस्तकांच्या लेखनासाठी सत्कार करण्यात आला.

उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, अजय वाणी, ममता राव, अधीक्षक अशोक मिश्रा, मुख्तार शहा, निसार खान, प्रशासकीय अधि किसन पावडे पाटील, विजय जाधव, श्रीमती नसरीन, विभाग निरीक्षिका आरीफा शेख, अश्फाक शेख, विश्वास रोकडे सहित अनेक अधिकारी, शायर, कवी यावेळी उपस्थित होते. असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येईल असे सांगून शिक्षणाधिकारी सरांनी सर्वांना आश्वस्त केले.


Bundelikhabar

Related posts

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र संगीत नाट्यमहोत्सवातून अवतरला रंगभूमीचा वैभवशाली कालखंड

Bundeli Khabar

कोपर में ताड़ी पीने से दो युवकों की मौत, ताड़ी की दुकान अनाधिकृत

Bundeli Khabar

नागरिकों ने कूड़े के ढेर में आग लगाकर मनपा प्रशासन का किया विरोध

Bundeli Khabar
error: Content is protected !!