26.4 C
Madhya Pradesh
September 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20220705 WA0002
महाराष्ट्र

पावसाची जोरदार बॅटींग सुरू

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

भुषण प्रभाकर कुंडईकर
मुंबई सह उपनगरे ,गोवा ,कोकण राज्यात पावसाने दमदार एँट्री कालपासून मारली आहे. राज्य भरात पावसाने धुमाकूळ घातला आहे.मुंबईत रात्री पासून जोरदार पावसाची सुरवात झाली आहे. त्यामुळे आज सायन सर्कल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. सततच्या पावसाने मुंबई ला झोडपून काढले आहे.भांडूपमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.त्याचप्रमाणे एल.बी.एस.रोड मार्गावरील वाहतुक पाणी साचल्यामुळे थांबली आहे.बोरिवली , दहिसर भागात पावसामुळे पाणी साचले आहे. मुंबई चे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.पावसाच्या जोरदार बॅटींग मुळे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.रेल्वे वाहतुक उशिराने चालु आहेत.मध्ये आणि हार्बर रेल्वे लाईन्स १५-२०मिनीटे उशीराने सुरू आहेत. पण पश्चिम रेल्वे वाहतुक मात्र व्यवस्थित सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ” आॅरेंज अॅलर्ट ” जारी करण्यात वर्तवण्यात आले आहे. वडाळा परिसरातही पाणी तुंबले आहे.पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन NDRF ची ८ पथके राज्यभरात तैनात केली गेली आहे.हवामान खात्याने येत्या २४ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज मुसळधार पावसामुळे विक्रोळीतील पंचशील नगरात खंडोबा टेकडी येथे दरड कोसळली आहे.मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे कोल्हापुरात नद्यांच्या नदीपातळीत वाढ झालेली आहे.त्याचप्रमाणे कोल्हापुरातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्याचप्रमाणे मुसळधार पावसामुळे रत्नागिरी च्या परशुराम घाटात दरड कोसळून वाहतुक ठप्प झाली आहे.युध्द पातळीवर दरड हटविण्याचे काम यंत्रणेकडून चालू आहे.


Bundelikhabar

Related posts

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम

Bundeli Khabar

भाजपाचे प्रदीप जोशी प्रभाग क्रमांक 21 अ मधून मैदानात…

Bundeli Khabar

मकान ढहने की वजह से 40 वर्षीय महिला की मौत

Bundeli Khabar
error: Content is protected !!