29.1 C
Madhya Pradesh
October 18, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – राजस्थानचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश
खेल

टाटा आयपीएल – राजस्थानचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा प्लेऑफचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने ७ गडी आणि ११ चेंडू राखून हा सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बेंगळुरूकडून रजत पाटिदारने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४२ चेंडूंत ५८ धावा काढल्या. चाचपडणाऱ्या रजतला रवीचंद्रन अश्विनने बाद केले. कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला ओबेद मकॉयने २५ धावांवर बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने झटपट २४ धावा काढल्या पण तितक्याच झटपट ट्रेण्ट बोल्टने त्याला बाद केले. इतर फलंदाजांनी वैयक्तिक काढलेल्या धावांपेक्षा अवांतरच्या १५ धावा बेंगळुरूची फलंदाजी कशी झाली सांगण्यासाठी पुरेशा ठरल्या. प्रसिद्ध कृष्णाने २२/३, ओबेद मकॉयने २३/३, ट्रेण्ट बोल्ट आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरने झटपट अर्धशतकी भागीदारी केली. जयस्वालला २१ धावांवर जोश हेझलवूडने बाद केले. कर्णधार संजू सॅमसनने देखील बटलर सोबत अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाच्या खात्यावर शतक झळकावले. संजूला वाणिंदू हसरंगाने बाद केले. १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोस बटलरने आपले शतक पूर्ण केले आणि १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सनसनीत षटकार मारत संघाचा विजय साजरा केला. त्याने १० चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ६० चेंडूंत नाबाद १०६ धावा काढल्या आणि एकहाती सामना जिंकून दिला. त्यालाच सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला.
रविवारी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरातने साखळी सामन्यात आणि प्लेऑफच्या सामन्यांत राजस्थान रॉयल्सला पराभूत केले आहे पण अंतिम फेरीत दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. राजस्थान रॉयल्सने २००८ साली सुरू झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला हरवून पहिला विजेता संघ ठरला होता. पण त्यानंतर त्यांना अंतिम फेरी गाठता आली नव्हती.

Related posts

टाटा आयपीएल – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय

Bundeli Khabar

भारताचा एकदिवसीय मालिकेवर ३-० असा कब्जा

Bundeli Khabar

राजस्थानचा रॉयल विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!