29.7 C
Madhya Pradesh
October 18, 2024
Bundeli Khabar
Home » राजस्थानचा रॉयल विजय
खेल

राजस्थानचा रॉयल विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा नऊवा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्सकडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल उतरले. जसप्रित बुमराहने तिसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जयस्वालला बाद केले. टीम डेव्हिडने त्याचा झेल टिपला. देवदत्त पडीक्कल झटपट बाद झाला. टायमल मिल्सने रोहित शर्मा कडे झेल देण्यास भाग पाडले. कर्णधार संजू सॅमसनने बटलर सोबत ८२ धावांची भागीदारी रचली. केरॉन पोलार्डने तिलक वर्माकडे झेल देण्यास त्याला भाग पाडले. त्याने एक चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूंत ३० धावा काढल्या. शिमरॉन हेटमायअरला झटपट धावा जमवण्याचं तंत्र चांगलंच अवगत आहे. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने १४ चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याला बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. त्याच षटकात बुमराहने जोस बटरलरचा त्रिफाळा उध्वस्त केला. बटरलरने ११ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ६८ चेंडूंत १०० धावा काढल्या. दोन्ही जम बसलेले फलंदाज बुमराहने बाद केले आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विन धावबाद झाला. टायमल मिल्सने झटपट रियान पराग आणि नवदीप सैनीला परतीचा रस्ता दाखवला. २०व्या षटकाच्या अखेरीस १९३/८ राजस्थानच्या खात्यावर जमा झाले होते.

मुंबई इंडिअन्सकडून डावाची सुरूवात करायला ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. रोहित स्वस्तामध्ये बाद झाला. अनमोलप्रित सिंगला सैनीने पडीक्कलकडे झेल द्यायला पाडले. तिलक वर्माने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. ईशान किशन आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याचं लक्ष विचलीत झालं त्याच संधीचा फायदा ट्रेण्ट बोल्टने घेतला. ईशानने ५ चौकार १ षटकाराच्या सहाय्याने ४३ चेंडूंत ५४ धावा काढल्या. जम बसलेल्या तिलक वर्माचा त्रिफाळा अश्विनने उध्वस्त केला. वर्माने ३ चौकार ५ षटकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ६१ धावा काढल्या. मुंबईला ३४ चेंडूंत ५९ धावांची गरज होती. टीम डेव्हिड, डॅनिअल सॅम, मुरूगुन अश्विन खेळपट्टीवर येऊन जाण्याची भूमिका निभावली. केरॉन पोलार्डने ३ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २४ चेंडूंत २२ धावा काढल्या. नवदीप सैनीने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर जोस बटलरकडे त्याला झेल देण्यास भाग पाडले. आणि राजस्थानने हा सामना २३ धावांनी जिंकला. मुंबईला अजून एका पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहित शर्माचा अतिआत्मविश्वास आणि संघाचं तिन्ही क्षेत्रातलं चालढकल असलेलं धोरण पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.

Related posts

क्रिकेटच्या पंढरी रंगणार “पहिली मुंबई प्रीमियर लीग २०२१

Bundeli Khabar

मार्टिना हिंगिस ने ‘ब्रेक पॉइंट’ में लिएंडर पेस और महेश भूपति की अनबिटेबल पार्टनरशिप पर कही ये बात

Bundeli Khabar

The Selection trials for the Sub-Junior & Cadet starts today in Mumbai

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!