21.1 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20220503 WA0006
खेल

टाटा आयपीएल – कोलकात्याने जबरदस्त सामना जिंकला

Bundelikhabar

8 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा सत्तेचाळीसावा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. कोलकाता क्नाईट रायडर्सने ७ गडी आणि ५ चेंडू राखून हा सामना जिंकला. कोलकाता क्नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने ७ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ४९ चेंडूंत ५४ धावा काढल्या. त्याला शिवम मावीने बाद केले. शिमरॉन हेटमायरने केवळ १३ चेंडूंत नाबाद २७ धावा काढल्या. जोस बटलरला २२ आणि रियान परागला १९ धावांवर टीम साऊदीने बाद केले. राजस्थान रॉयल्सने १५२/५ असे माफक आव्हान उभे केले. टीम साऊदीने ४६/२, उमेश यादवने २४/१, अनुकूल रॉयने २८/१, शिवम मावीने ३३/१ गडी बाद केले.

कोलकाता क्नाईट रायडर्सकडून नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी निर्णायक कामगिरी केली आणि विजय साकारला. नितीश राणाने ३ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३७ चेंडूंत नाबाद ४८ धावा काढल्या. त्यानेच विजयी षटकार मारला. रिंकू सिंगने ६ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २३ चेंडूंत नाबाद ४२ धावा काढल्या. केवळ ३.४ षटकात यांनी अर्धशतकी भागीदारी केली. हीच भागीदारी निर्णायक ठरली. कर्णधार श्रेयस अय्यरला ट्रेण्ट बोल्टने ३४ धावांवर बाद केले. बाबा इंद्रजीतला प्रसिद्ध कृष्णाने १५ धावांवर बाद केले. कोलकाता क्नाईट रायडर्स १९.१ षटकांच्या खेळातच हा सामना ७ गडी आणि ५ चेंडू राखून जिंकला. त्यांनी १५८/३ अशी विजयी धावसंख्या नोंदवली. ट्रेण्ट बोल्टने २५/१, कुलदीप सेनने २८/१, प्रसिद्ध कृष्णाने ३७/१ गडी बाद केले.

रिंकू सिंगला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने २३ चेंडूंत महत्त्वपूर्ण नाबाद ४२ धावांचे योगदान दिले होते. उद्याचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स हा सामना एकतर्फी जिंकून गुणतक्त्यात आपलं स्थान अधिक बळकट करेल.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – लखनौ ठरले सुपर जायंट्स

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – पंजाब ५ गडी राखून विजयी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अखेर पंजाबच ठरले किंग

Bundeli Khabar
error: Content is protected !!