34.6 C
Madhya Pradesh
July 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220429 WA0001
खेल

टाटा आयपीएल – अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विजयी

Bundelikhabar

8 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा चाळीसावा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. अटीतटीचा हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४२ चेंडूंत ६५ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा अल्झारी जोसेफने उध्वस्त केला. ऐडेन मार्करामने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४० चेंडूंत ५६ धावा काढल्या. त्याला यश दयालने बाद केले. शशांक सिंगने १ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ६ चेंडूंत बिनबाद २५ धावा काढल्या. राहुल त्रिपाठीला १६ धावांवर महंमद सामीने पायचित टिपले. सनरायझर्स हैदराबाद १९५/६ धावांचा डोंगर रचला. महंमद सामीने ४-०-३९-३, यश दयालने ४-०-२४-१, अल्झारी जोसेफने ४-०-३५-१ यांनी गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सकडून वृद्धिमान सहाने ११ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ३८ चेंडूंत ६८ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा उमरान मलिकने उध्वस्त केला. शुबमन गिलला २२ धावांवर उमरान मलिकने बाद केले. डेव्हिड मिलरला १७ धावांवर उमरान मलिकने बाद केले. कर्णधार हार्दिक पांड्यालाही १० धावांवर उमरान मलिकनेच बाद केले. राहुल तेवटीया आणि राशिद खान जोडीने सामना जिंकायचाच ह्या निर्धारानेच खेळ सुरू केला. गुजरात टायटन्सला विजयासाठी ६ चेंडूंत २१ धावांची गरज होती. मार्को जानसेनच्या पहिल्या चेंडूवर शानदार षटकार मारला. पुढच्या चेंडूवर १ धाव काढली. पुढच्या ४ चेंडूंवर राशिद खानने ३ षटकार मारत गुजरात टायटन्सच्या नावावर विजय नोंदवला. गुजरात टायटन्सची विजयी धावसंख्या १९९/५ होती. हैदराबादच्या उमरान मलिकने ४-०-२५-५ गडी बाद केले. त्यालाच सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

उद्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता क्नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली संघ हा सामना जिंकून गुणतक्त्यात सहावं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करेल.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – मुंबईचा पलटवार चेन्नईवर ५ गडी राखून विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबादचा जबरदस्त विजय

Bundeli Khabar

State Level Judo Championship to be played from 30th October at Sangli

Bundeli Khabar
error: Content is protected !!