23.5 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20220429 WA0000
खेल

टाटा आयपीएल – दिल्ली कॅपिटल्स गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर

Bundelikhabar

8 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा एकेचाळीसावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता क्नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ४ गडी आणि ६ चेंडू राखून जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
कोलकाता क्नाईट रायडर्सकडून नितीश राणाने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३४ चेंडूंत ५७ धावा काढल्या. त्याला मुस्तफिझूर रहमानने बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरला कुलदीप यादवने ४२ धावांवर बाद केले. रिंकू सिंगला २३ धावांवर मुस्तफिझूर रहमानने बाद केले. डावाचं शेवटचं षटक मुस्तफिझूर रहमानने टाकलं. त्यात त्याने रिंकू सिंग, नितीश राणा आणि टीम साऊदी यांना बाद केले. कुलदीप यादवने ३-०-१४-४, मुस्तफिझूर रहमानने ४-०-१८-३, चेतन सकारियाने ३-०-१७-१, अक्षर पटेलने ४-०-२८-१ यांनी गडी बाद केले. कोलकाता क्नाईट रायडर्स १४६/९ इतकीच मजल गाठू शकला.

दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नरने ८ चौकारांसह २६ चेंडूंत ४२ धावा काढल्या. त्याला उमेश यादवने बाद केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉल स्वतःच्याच उमेश यादवने झेलबाद केले होते. रोवमन पॉवेलने १ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने केवळ १६ चेंडूंत बिनबाद ३३ धावा काढल्या. अक्षर पटेलला २४ धावांवर श्रेयस अय्यरने धावचीत केले. ललित यादवला सुनिल नरेनने २२ धावांवर बाद केले. मिशेल मार्शला १३ धावांवर हर्षित राणाने बाद केले. सामन्याच्या १९ षटकात श्रेयस अय्यरने पहिल्या चार चेंडूंवर शार्दुल ठाकूरला एकही धाव काढू दिली नाही. पाचव्या चेंडूवर शार्दुलने एक धाव काढली. सहाव्या चेंडूवर रोवमन पॉवेलने विजयी षटकार मारून दिल्लीच्या नावावर विजय कोरला. दिल्ली कॅपिटल्सने १५०/६ असा विजय साकारला. उमेश यादवने ४-०-२४-३, हर्षित राणाने ३-०-२४-१, सुनिल नरेनने ४-०- १९-१ यांनी गडी बाद केले.

कुलदीप यादवला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने ३-०-१४-४ गडी बाद केले होते. उद्या पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर होणार आहे. लखनौचा संघ हा सामना जिंकून गुणतक्त्यात तिसरं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करेल.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय

Bundeli Khabar

गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

Bundeli Khabar
error: Content is protected !!