34.6 C
Madhya Pradesh
July 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220411 WA0021
खेल

टाटा आयपीएल – शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्याच वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला सामना राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्सने ३ धावांनी जिंकला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्सकडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल उतरले. दोघांनीही सतत धावा काढत धावफलक हलता ठेवला. आवेश खानने जोस बटलरचा १३ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. कर्णधार संजू सॅमसनही हळूहळू धावा जमवत होता पण जेसन होल्डरने त्याला १३ धावांवर पायचीत टिपले. देवदत्त पडीक्कलला कृष्णाप्पा गौथमने २९ धावांवर बाद केले. त्याच षटकात आर. दुस्सेनला कृष्णाप्पा गौथमने झटपट बाद केले. इतक्यात शिमरॉन हेटमेअर नावाचं वादळ मैदानावर धडकलं. रवीचंद्रन आश्विनच्या जोडीने त्याने धावसंख्या फुगवली. २८ धावांवर खेळत असताना आश्विन दुखापतीमुळे बाहेर गेला. रियान परागला जेसन होल्डरने झटपट बाद केले. ट्रेंण्ट बोल्टने बिनबाद २ तर हेटमेअरने एक चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ३६ चेंडूंत बिनबाद ५९ धावा काढल्या. राजस्थानने २०व्या षटकाच्या अखेरीस १६५/६ जमा केल्या.

लखनौ सुपर जायंट्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार के. एल. राहुल आणि क्विंटन डिकॉक उतरले. ट्रेंण्ट बोल्टने पहिल्याच चेंडूवर राहुलचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याच्याजागी आलेल्या कृष्णाप्पा गौथमला लगचेच पायचीत टिपले. जेसन होल्डरने झटपट दोन चौकार मारले. प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद केले. डिकॉक आणि दीपक हुडा डावाला आकार देण्याचा प्रयत्न करू लागले. पण कुलदीप सेनने दीपक हुडाचा २५ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. यझुवेंद्र चहलने आयुष बदोनीला झटपट बाद केले. १२व्या षटकाच्या अखेर लखनौचा अर्धा संघ ७४ धावांवर परतला होता. कृणाल पांड्या वेगाने धावा जमा करू लागला. क्विंटन डिकॉक एक बाजू लावून होता. यझुवेंद्र चहलने डिकॉकला ३९ धावांवर बाद केले आणि त्याच षटकात पांड्यालाही २२ धावांवर परतीचे तिकीट दिले. मार्कस स्टॉईनिशने दुशमंता चमिराच्या जोडीने वेगाने धावा जोडल्या. कोणताही संघ सामना जिंकू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. यझुवेंद्र चहलने चमिराला १३ धावांवर पायचित टिपले. आवेश खानने बिनबाद ७ धावा काढल्या. तर स्टॉईनिशने दोन चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने १७ चेंडूंत बिनबाद ३८ धावा काढल्या. शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना कुलदीप सेनने टिच्चून मारा करताना केवळ ११ धावा दिल्या. आणि राजस्थानने हा सामना ३ धावांनी जिकला.
यझुवेंद्र चहलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४ षटकांत ४१ धावांमध्ये ४ गडी बाद केले होते.

उद्याचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. गुजरात सलग ३ सामने जिंकून पूर्ण जोषात आहे तर हैदराबादला दुसर्‍या विजयाचे वेध लागले आहेत.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – मुंबई इंडिअन्सचा सलग दुसरा विजय

Bundeli Khabar

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधुच्या हातात झळकणार तिरंगा

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – मुंबईचा पलटवार चेन्नईवर ५ गडी राखून विजय

Bundeli Khabar
error: Content is protected !!