25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » लखनौ संघच ठरला सुपर जायंट्स
खेल

लखनौ संघच ठरला सुपर जायंट्स

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा बारावा सामना लखनौ सुपर जायंट्सने जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार के. एल. राहुल आणि क्विंटन डीकॉक उतरले. वॉशिंग्टन सुंदरने दुसर्‍या षटकातच डीकॉकला बाद केले. केन विल्यमसनने त्याचा झेल टिपला. त्याच्या जागी आलेल्या ईविन लुईसला पुढच्याच षटकात पायचित टिपले. राहुलच्या साथीला मनीष पांडे आला. पण स्थिरस्थावर होण्याआधीच रोमारिओ शेफर्डने भुवनेश्वर कुमारकडे त्याला झेल देण्यास भाग पाडले. लखनौ २७/३ अशा अवस्थेत असताना दीपक हुडा मैदानात उतरला. त्याने आणि राहुलच्या साथीने डावाला आकार देण्यास सुरूवात केली. हुडाचे खास फटके पाहून राहुलही स्ट्राईक जास्तीतजास्त हुडाकडे देण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत होता. लखनौ संघाच्या मदतीला पुन्हा शेफर्ड आला. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर हुडाला राहुल त्रिपाठीकडे झेल देण्यास भाग पाडले. हुडाने प्रत्येकी ३ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ५१ धावा काढल्या. आयुष बदोनी झटपट धावा वाढवण्यासाठी प्रयत्न करत होता. राहुलही आज चांगला खेळत होता. त्याची खेळी टी. नटराजनने पायचीत करून संपवली. राहुलने ६ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ५० चेंडूंत ६८ धावा काढल्या. त्याच षटकात कृणाल पांड्याचा त्रिफाळा नटराजनने उध्वस्त केला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर आयुष बदोनी विचित्र पद्घतीने धावबाद झाला आणि लखनौ १६९/७ तंबूत परतले.

सनरायझर्स हैदराबाद कडून खेळाची सुरूवात करायला अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विल्यमसन उतरले. विल्यमसन झटपट १६ धावा काढून तंबूत परतला. आवेश खानने त्याला बाद केले. पुढच्याच षटकात आवेश खानने अभिषेक शर्माला मनीष पांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. हैदराबाद ३८/२ अशा अवस्थेत असताना राहुल त्रिपाठी आणि ऐदेन मार्करामची जोडली जमली. ऐदेन मार्करामला कृणाल पांड्याने के. एल. राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. जमलेली जोडी फुटल्यानंतर अवघ्या काही षटकांत राहुल त्रिपाठी बाद झाला. रवी बिश्नोईने त्याचा झेल टिपला. त्रिपाठीने ६५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३० चेंडूंत ४४ धावा काढल्या. निकोलस पुरनने त्वेषात फलंदाजीला सुरूवात केली. त्याला आवर घालण्यासाठी आवेश खानला पुन्हा गोलंदाजीसाठी आणले. त्याने पुरनला हुडाकडे झेल देण्यास भाग पाडले. पुरनने ३४ धावा काढल्या. आवेशने पुढच्याच चेंडूवर अब्दुल समदला शून्यावर बाद केले. सामन्याच्या शेवटच्या षटकात तीन गडी बाद झाले. जेसन होल्डरने वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड आणि भुवनेश्वर कुमार यांना नाट्यमय पद्घतीने बाद केले आणि हैदराबादने १५७/९ असा सामना गमावला. आवेश खानला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४ षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात ४ महत्वाचे गडी बाद केले होते.

उद्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. राजस्थान आतापर्यंत दोन्ही सामने जिंकून शीर्षस्थानी आहे. बेंगळुरू पुन्हा विजयाची चव चाखायला उत्सुक आहे.

Related posts

टाटा आयपीएल – बेंगळुरू १४ धावांनी विजयी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ६७ धावांनी विजयी

Bundeli Khabar

भारताचा वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!