31.1 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » सेन्सेक्सने सलग पाचव्या सत्रात उच्च पातळी गाठली
व्यापार

सेन्सेक्सने सलग पाचव्या सत्रात उच्च पातळी गाठली

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयटी, ऑटो आणि बँकिंग यांच्या नेतृत्वाखाली १४ मार्च रोजी सेन्सेक्सने सलग पाचव्या सत्रात उच्च पातळी गाठली. सेन्सेक्स शुक्रवार प्रमाणे आजही लाल रंगात उघडल्यानंतर, समभागांनी लवकरच तोटा भरून काढला. आयटी आणि बँक निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले, तर रियल्टी निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी खाली आले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वधारला.

बँक ऑफ इंग्लंड आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराचा निर्णय आणि देशांतर्गत चलनवाढीची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे सोमवारी ब्रिटिश पाउंड अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. बँक ऑफ इंग्लंड आणि यूएस फेडरल रिझर्व्ह दोघांनीही त्यांच्या बैठकांमध्ये त्यांचे मुख्य व्याजदर २५ बेस पॉइंट्सने वाढवताना दिसले. या आठवड्यात बाजार अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमधील चर्चा सुरू असूनही तणाव कायम आहे. एलअायसीच्या अायपीओची तारीख देखील येत्या काही दिवसांत बाजाराची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचा भूमिका निभावू शकेल.

इन्फोसिस, एसबीआय, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी आणि अ‍ॅक्सिस बँक हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर आयओसी, ओएनजीसी, एचयूएल, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी लाइफला तोटा झाला. निफ्टी १६,८०० च्या वर; आयटी, ऑटो, बँकांच्या नेतृत्वाखाली सेन्सेक्स ९३५ अंकांनी वाढला. आयटी आणि बँक निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले, तर रियल्टी निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी खाली आले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वधारला

सेन्सेक्स ९३५.७२ अंकांनी किंवा १.६८% वर ५६,४८६.०२ आणि निफ्टी २४०.८५ अंकांनी किंवा १.४५% वर १६,८७१.३० वर होता. सुमारे १६८४ शेअर्स वाढले आहेत, १७०६ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १३४ शेअर्स अपरिवर्तित आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.५४ वर बंद झाला

Related posts

टाटा आयपीएल – अखेर पंजाबच ठरले किंग

Bundeli Khabar

सेन्सेक्स ७०० अंकांनी गडगडले

Bundeli Khabar

एमजी मोटर इंडियाचा महाराष्ट्रात विस्तार,चेंबूरमध्ये नवीन विक्री सुविधा केंद्राची सुरुवात

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!